यासंदर्भात ‘तो मी नव्हेच ते तो मीच’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, फरार आरोपीच्या यादीत सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांचे नाव प्रसिद्ध झाले होते. पहाडिया यांनी सांगितले की, दि. २२ एप्रिल २००८ रोजीचे आंदोलनाचे ते प्रकरण आहे. याप्रकरणाचे दोषारोपपत्र पोलिसांनी दि. २४ सप्टेंबर २००९ रोजी न्यायालयात दाखल केले; परंतु दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याने न्यायालयाने दि. २१ डिसेंबर २०१० रोजी पोलिसांचे दोषारोपपत्र फेटाळले. या प्रकरणातील कुणीही फरार नाही अथवा कुणालाही समन्स बजावण्यात आलेले नव्हते. ते प्रकरण निकाली काढण्यात आल्याने केसच संपलेली आहे.
न्यायालयाने दोषारोपपत्र फेटाळल्याने ती केस निकाली
By | Updated: December 4, 2020 04:11 IST