शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशाला शांती अन् प्रेमाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:33 IST

सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो मुस्लीम बांधवांनी यात सहभाग घेत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.अमन मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव सकाळपासून शहरात दाखल झाले होते. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अमन मार्चला सुरुवात करण्यात आली. मार्चमध्ये सर्वात पुढे लहान मुले चालत होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वयंसेवकांनी मानवी साखळी केल्याचे दिसून आले.हातात राष्ट्रीय एकता व सामाजिक एकतेचा संदेश देणारे फलक घेतलेल्या युवकांचा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मार्चमध्ये सहभागी प्रत्येक जण शिस्तीचे पालन करताना दिसून आले.कादराबाद, फूल बाजार, मामा चौक, गरीबशहा बाजार, मस्तगड, गांधीचमन मार्गे काढण्यात आलेल्या मार्चचे टॉऊन हॉल परिसरात सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुधाकर निकाळजे, राजेंद्र राख, अब्दुल रशीद, जमाते इस्लामीचे अब्दूल मुजीब, अण्णा चितेकर यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिअत उलमाचे मोठे योगदान राहिले आहे.देशात आज सामाजिक सलोख्याची गरज आहे. जमिअत उलमाचे शहराध्यक्ष मुफ्ती रहेमान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की हा अमन मार्च सर्व जाती धर्मांचा आहे. देशात असहिष्णुता वाढत असून, वातावरण असुरक्षित बनत आहे. अमन मार्चच्या माध्यमातून देशात शांती, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हसन काशमी, एकबाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीतानाने अमन मार्चची सांगता झाली. या अमन मार्चसाठी मुफ्ती फहीम, शाहआलम खान, शेख महेमूद, माजेद शेख, अ‍ॅड. सय्यद अमजद, मोहसीन शेख, अख्तर शेख, आमर पाशा आदींनी पुढाकार घेतला.