शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

देशाला ‘सबका साथ, सबकी सुरक्षा’ हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:03 IST

औरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत. मृतात २८ मुस्लिमांसह उर्वरित ८ दलित आणि अन्य जातीचे आहेत. मुस्लिम व दलितांना देशात ठरवून टार्गेट केले जात आहे; परंतु आम्ही मानवतावादी इस्लामचे पाईक आहोत. त्यांच्या या भ्याड हल्ल्याला हिंसेने प्रत्त्युत्तर देणार नाही, अन्यथा त्यांच्यात व आमच्यात काहीच फरक राहणार नाही, असे संयमी विचार मजलिस -ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) सर्वेसर्वा खा. असदोद्दीन ओवेसी यांनी शनिवारी (दि.२२) येथे मांडले. गोरक्षकांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खा. असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी आझाद चौकातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. रॅलीचे रूपांतर भडकल गेट येथे जाहीर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. ओवेसी यांनी तब्बल तासभर भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व गोरक्षकांवर टीकेची झोड उठविली. खा. ओवेसी म्हणाले, देशात गोरक्षकांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ जणांचे प्राण घेतले. त्याचे दु:ख म्हणून हा कॅण्डल मार्च आम्ही काढला आहे. ही आनंदाची वेळ नाही. मृत ३५ जणांच्या नावाची यादीच वाचवून दाखवत प्रत्येकाचा खून क सा झाला, याचे वर्णनच ओवेसी यांनी कथन केले. या बहुतांश हत्या गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत झाल्या आहेत. या ३५ कुटुंबांचे सध्या बेहाल आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाजप मानवतावादाच्या गप्पा मारते; पण वास्तव मात्र वेगळे आहे, असे सांगत ओवेसी म्हणाले, त्यांनी कितीही हिंसा केली तरी आम्ही प्रत्त्युत्तर देणार नाही. कारण इस्लाम शिकवण मानवतेला प्राधान्य देणारी आहे. यावेळी आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक या कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.