शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

विधानसभेची आज मतमोजणी

By admin | Updated: October 19, 2014 00:42 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी होणार असून प्रशासनाने या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी होणार असून प्रशासनाने या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांची मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल असणार आहेत. सर्वप्रथम सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत यावेळी तब्बल १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बुधवारी मतदान होताच या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मध्ये बंद झाले. आता उद्या रविवारी या सर्वांचे भवितव्य ठरणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नऊ मतदारसंघांची मतमोजणी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. सर्वप्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केली जाईल. मोजणीसाठी १४ टेबल असल्यामुळे एका फेरीत १४ मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांचा विचार करता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १९ ते जास्तीत जास्त २४ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटांचा वेळ लागणार आहे. टपाली मतदान आणि त्यानंतरच्या प्रत्येक फेरीसाठी लागणारा वेळ पाहता दुपारी १ वाजेनंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी टॅब्युलेशन टीमही असणार आहे. ही टीम प्रत्येक ईव्हीएम मशीन प्राप्त मतांची आकडेवारी संगणकात फीड करेल. त्याचवेळी ही आकडेवारी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील लिंकवरही अपडेट केली जाणार आहे. मोजणीसाठी हजार कर्मचारीमतमोजणीसाठी एका मतदारसंघात १२० याप्रमाणे जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत एकूण एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. याशिवाय मास्टर ट्रेनर आणि रो आॅफिसर्सही असणार आहेत. मतमोजणीची रंगीत तालीम संपन्नऔरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची आज रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व ९ मतदारसंघांतील मतमोजणीच्या ठिकाणी त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही तालीम घेतली. औरंगाबाद (मध्य) मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात आणि सहायक निवडणूक अधिकारी अभय म्हस्के यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मतमोजणीची रंगीत तालीम करून घेतली. पैठण मतदारसंघाची तालीम रवींद्र पवार, सिल्लोड मतदारसंघाची सी.एस. कोकणी, कन्नड मतदारसंघात राजू नंदकर, फुलंब्री मतदारसंघात संजीव जाधवर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात रिता मेत्रेवार, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात स्वाती कारले, गंगापूर मतदारसंघात संगीता सानप आणि वैजापूर मतदारसंघात नारायण उबाळे यांच्या उपस्थितीत मोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.