शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी कृउबाच्या मतमोजणीत घोळ

By admin | Updated: September 10, 2015 00:33 IST

वडवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीदरम्यान मतमोजणीत अधिकाऱ्यांनीच घोळ केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

वडवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीदरम्यान मतमोजणीत अधिकाऱ्यांनीच घोळ केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा उपनिबंधक, पोलिसाना गोपनीय अहवाल दिला असून पराभूत उमेदवारांनी पडताळणी करुन न्यायाची मागणी बुधवारी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी रात्री निकालही जाहीर करण्यात आला. १२ जागा भाजपाला तर ६ जागा राष्ट्रवादीला मिळाल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीच्या ताब्यातील या संस्थेवर भाजपाने झेंडा फडकावला. त्यामुळे निवडणुकीची चर्चा जिल्हाभर झाली. मात्र, निकालास चोवीस तासही पूर्ण होत नाही तोच निवडणूक निर्णय अधिकारी एच. पी. कांबळे यांनी मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मतांचे गणित मुद्दामहून चुकविले अन् काही पराभूत उमेदवारांना विजयी केल्याची खळबळजनक तक्रार केली. कांबळे यांनी जिल्हाधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, वडवणी तसेच वडवणी ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. मतमोजणी अधिकारी एस. एस. तारडे यांच्यावर त्यांनी ठपका ठेवला आहे. सहायक निबंधक विकास जगदाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.कारवाई अटळ!जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्याकडून अहवाल मागविला आहे. दोषींची गय केली जाणार नसून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. अहवालानंतर काय ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.पाच उमेदवारांच्या तक्रारीमतमोजणी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजपाने यंत्रणा मॅनेज केली. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राज शेंडगे, गुलाब राऊत, दिनेश मस्के यांनी केली आहे. विलास मुंडे, सचिन लंगडे यांनी प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)