शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ रुंदीकरणासाठी शहर हद्दीतील मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार केला जात असून, १८२ एकर जमिनीचे संपादन करण्यासाठी १८ ते ३० ...

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार केला जात असून, १८२ एकर जमिनीचे संपादन करण्यासाठी १८ ते ३० जानेवारीपर्यंत संयुक्त मोजणी झाली. त्यानंतर सहा महिन्यांनी शहर भूमिअभिलेख कार्यालय हद्दीत येणाऱ्या सुमारे २५० मालमत्तांची मोजणी मंगळवारपासून सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.ने भू-मोजणीच्या अनुषंगाने ३ लाख ५१ हजार रुपये ऑक्टोबर २०२० मध्ये भूमिअभिलेख कार्यालयास जमा केले होते, परंतु शहर भूमापन कार्यालयाचे शुल्क भरले नव्हते. नगर भूमापन कार्यालयाचे शुल्क कंपनीने भरल्यानंतर प्रत्यक्षात मोजणी सुरू करण्यात आली आहे. असे नगरभूमापन अधिकारी गणेश सोनार यांनी सांगितले. चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७ आणि ५५५ मध्ये मोजणी झाली आहे. मोजणीअंती सीमांकन करण्यात आले आहे.

सध्या विमानतळाची धावपट्टी ९ हजार ३०० फूट म्हणजेच २ हजार ८३५ मीटर आहे. १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भूसंपादन करावे लागत आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. पहिल्या टप्प्यात १५५ एकर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन एकर, तिसऱ्या टप्प्यात दोन एकर आणि चौथ्या टप्प्यात २० एकर अशी १८२ एकर संपादित करण्यात येणार आहे.

विमानतळ भूसंपादन असे

गावठाणसह अंदाजे किती मालमत्ता जाणार - १२०० ते १३००

किती जमीन ताब्यात घेणार - १८२ एकर

धावपट्टीचे विस्तारीकरण किती - ८२५ मीटर

कोणत्या गटात होत आहे मोजणी - मुकुंदवाडीतील १३, १५, १६, १८, २६, २७

मूर्तजापूरमधील ३४, ३०, ३१,- चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ५५५

सध्या विमानतळाची धावपट्टी किती - ९ हजार ३०० फूट म्हणजेच २ हजार ८३५ मीटर

किती फूट धावपट्टीचा विस्तार - १२ हजार फुटापर्यंत धावपट्टी विस्तार

पहिल्या टप्प्यात किती भूसंपादन - १५५ एकर

दुसऱ्या टप्प्यात किती भूसंपादन - साडेतीन एकर

तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात किती भूसंपादन - दोन एकर आणि २० एकर

भूमापन अधिकाऱ्यांची माहिती अशी

नगरभूमापन अधिकारी गणेश सोनार यांनी सांगितले, गावठाण हद्दीतील मालमत्तांची मोजणी सुरू केली आहे. पूर्ण मोजणीसाठी एक आठवडा लागेल. त्यानंतर अंतिम आखणी होईल. सर्व मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या आहेत. काही मालमत्ता नगर भूमापन हद्दीत आहेत, परंतु त्या अनधिकृत आहेत. त्या मालमत्तांचीदेखील मोजणी करण्यात येणार आहे. २०० ते २५० मालमत्ता भूमापन कार्यालय हद्दीत असल्याचे सोनार म्हणाले. सीटीएस क्रमांक ४०४ पासून मालमत्ता बाधित होणार आहेत.