शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चिकलठाणा विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:05 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी १८२ एकरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. १८ जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणासाठी भूसंपादन ...

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करण्यासाठी १८२ एकरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. १८ जानेवारीपासून धावपट्टी रुंदीकरणासाठी भूसंपादन अनुषंगाने संयुक्त मोजणी सुरू झाली आहे. एका आठवड्यात मोजणी आणि मार्किंग पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने आधुनिक यंत्रे आणली आहेत. क्वार्स या यंत्राच्या आधारे मोजणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.ने मोजणीसाठी तीन लाख ५१ हजार रुपये ऑक्टोबर २०२०मध्ये भूमिअभिलेख कार्यालयास जमा केल्यानंतर सोमवारी प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात झाली आहे. मुकुंदवाडीतील १३, १५, १६, १८, २६, २७, मूर्तजापूरमधील ३४, ३०, ३१ या गटातील तर चिकलठाणा येथील गट नं. ४१०, ४१४, ४१५, ४१६, ४१७ आणि ५५५ मध्ये मोजणी होत आहे. मोजणीअंती प्रत्यक्ष सीमांकन पाहण्यात करण्यात येत आहे.

सध्या विमानतळाची धावपट्टी नऊ हजार ३०० फूट म्हणजेच दाेन हजार ८३५ मीटर आहे. १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भूसंपादन करावे लागणार आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे आला आहे. पहिल्या टप्प्यात १५५ एकर, दुसऱ्या टप्प्यात साडेतीन एकर, तिसऱ्या टप्प्यात दोन एकर आणि चौथ्या टप्प्यात २० एकर असा १८२ एकर संपादित करण्याचा प्रस्ताव सध्या समोर आलेला आहे.

भूसंपादनाचा मावेजा अद्याप ठरलेला नाही

७/१२ भूमिअभिलेख कार्यालयाकडे आल्यानंतर संयुक्तरीत्या जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला मोठी रक्कम लागेल. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणार असून, यासाठी किती रक्कम द्यावी लागेल, हे अद्याप निश्चित झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.