शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसाठी मोजा १४५०,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

\Sट्रॅव्हल्सची दिवाळी : गर्दीमुळे, प्रवाशांच्या खिशाला कात्री औरंगाबाद : ट्रॅव्हल्सने औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी १४५०, तर मुंबईसाठी ८१० रुपये मोजावे ...

\Sट्रॅव्हल्सची दिवाळी : गर्दीमुळे, प्रवाशांच्या खिशाला कात्री

औरंगाबाद : ट्रॅव्हल्सने औरंगाबादहून नागपूरला जाण्यासाठी १४५०, तर मुंबईसाठी ८१० रुपये मोजावे लागत आहेत. बसच्या प्रकारानुसार वेगवेगळे भाडे आहेत. मात्र, ऐन दिवाळीत २० टक्क्यांपर्यंत झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे.

लॉकडाऊनमुळे तब्बल ५ महिने ट्रॅव्हल्स बसची चाके जाम झाली होती. परंतु राज्य सरकारने परवानगी दिली आणि ट्रॅव्हल्सची चाके २ सप्टेंबरपासून गतिमान झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिक आणि प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र, डिझेलची दरवाढ, कोरोनामुळे स्लिपर बसमधून २० प्रवासी, तर सिटींग बसमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी अशी मर्यादित प्रवाशांची वाहतूक, मास्क, सॅनिटायझर आदींवरील खर्चामुळे प्रवास महागला. दोन महिन्यांनंतर आता कुठे रविवापासून (दि. ८) ट्रॅव्हल्स पूर्ण आसन क्षमतेने धावू लागल्या. पण आता दिवाळीचा सिझन सुरू झाला. त्यामुळे पुन्हा भाडेवाढीचा कालावधी. तुलनेत एसटीने दिवाळीतील भाडेवाढ रद्द केली आहे.

दरवर्षी आर्थिक भुर्दंड

दरवर्षी दिवाळीत ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. इतर वेळी कमी पैसे लागतात. आता मात्र अधिक रक्कम द्यावी लागत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. त्यात असा फटका सहन करावा लागतो.

- प्रशांत गुडदे , प्रवासी

व्यावसायिक आर्थिक अडचणीत

ज्या बस औरंगाबादहून धावतात, त्याच्या तिकीट दरात फार वाढ झालेली नाही. औरंगाबादमार्गे जाणाऱ्या इतर शहरांतील बसचे दर अधिक दिसतात. दिवाळीमुळे २० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झालेली आहे. परंतु अद्यापही पुरेसे प्रवासी नाहीत. त्यामुळे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत.

- पुष्कर लुले, सहसचिव, बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट्स वेल्फेअर असोसिएशन

चौकट..

प्रवासभाडे --दिवाळीपूर्वी-- सध्या ट्रॅव्हल्स-- एसटी

औरंगाबाद-पुणे --४०० ---५०० ---३००

औरंगाबाद -मुंबई --७०० ---८१० --- ६६५

औरंगाबाद-नागपूर -- १२०० --- १४५० ---९५०

औरंगाबाद-लातूर --५०० ---६०० --- ४४०

औरंगाबाद-सोलापूर --- ४०० --- ६०० ----४१५