शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टांना नगराध्यक्षांचे अभय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:29 IST

भ्रष्ट कर्मचाºयांना डॉ.भारतभूषण क्षीरसागरच पाठिशी घालत असल्याचा आरोप काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांनी आायोजित केलेल्या विशेष सभेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. यामध्ये काही कर्मचाºयांचा समावेश आहे. या भ्रष्ट कर्मचाºयांना डॉ.भारतभूषण क्षीरसागरच पाठिशी घालत असल्याचा आरोप काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांनी आायोजित केलेल्या विशेष सभेत केला. तसेच या सभेत पालिकेतील दोन कर्मचाºयांच्या कारवाईसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. पिठासिन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी काम पाहिले.बीड पालिकेतील वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. नगराध्यक्ष आणि काकू-नाना आघाडी नेहमी एकमेकांवर आरोप करून पालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणत आहेत. लेखापाल गणेश पगारे आणि ट्रेसर सलीम यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यांना दोषी ठरवूनही नगराध्यक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा दावा करत त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावण्याची मागणी काकू-नाना आघाडीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमर नाईकवाडे व इतरांनी केली होती. नगराध्यक्षांनी ती मान्य न केल्याने नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला विभागीय आयुक्तांकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.अखेर मंगळवारी दुपारी पालिका सभागृहात ही बैठक झाली. एमआयएम नगरसेवकांच्या अस्थिर भूमिकेमुळे बैठकीसाठी गणपूर्ती होईल का? यावरच प्रश्नचिन्ह होते, मात्र अर्धा तासाच्या प्रतिक्षेनंतर आघाडीच्या नागरसेवकांसोबतच एमआयएम स्वतंत्र गटाच्या काही नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्याने गणपूर्ती झाली. पीठासन अधिकाºयांनी या विषयावर प्रत्येक सदस्याला मत मांडण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र उपस्थित सर्वच सदस्यांनी अमर नाईकवाडे हेच भूमिका मांडतील, असे सांगत नाईकवाडेंकडे सारी सूत्रे सोपविली. अमर नाईकवाडे यांनी विविध चौकशी अहवाल, तक्रारी सभागृहासमोर मांडून या गैरप्रकारांना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. या दोन्ही कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे बैठक सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनीही बैठकीला हजेरी लावली.