शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक राजू तनवाणी आणि राज आहुजा हे दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची या दोघांना पोलीस दलातील त्यांच्या ‘खबऱ्या’कडून आधीच खबर पोहोचविण्यात आली. त्याचा फायदा घेत हे दोन्ही आरोपी अटक टाळण्यासाठी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/२ मधील ग्रीन झोन जमिनीवर रेणुकानगर नावाने अवैध रेखांकन तयार करून तेथे २० बाय ३० आकाराचे २१० भूखंड पाडले. पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/१ आणि ९९/२ मधील १८ एकर २९ गुंठे जमिनीच्या मालकीहक्काबाबत मूळ मालक माधवराव सोनवणे विरुद्ध हिंमतराव कोरडे यांच्यात न्यायालयात वाद सुरू होता. वाद सुरू असताना कोरडे यांचे वारस संतराम कोरडे यांनी ५ एकर ३९ गुंठे जमीन राजू तनवाणी यांना आम मुख्यत्यारपत्र (जीपीए) करून दिले. जीपीएच्या आधारे तनवाणी आणि राज आहुजा यांनी तत्कालीन तलाठ्याच्या मदतीने रेणुकानगर नावाने अनधिकृत ले-आऊट करून २१० प्लॉट पाडले. तनवाणीकडून जीपीए करून घेत आहुजाने गोरगरीब आणि अल्पशिक्षित लोकांना लाखो रुपयांत भूखंड विक्री केले. याप्रकरणी विशेष म्हणजे या जमिनीबाबत कोर्टात वाद सुरू असल्याचे त्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवले. दरम्यान ही जमीन सोनवणे यांच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून तेथील रहिवाशांकडून घरे खाली करून घेतली. बेघर झालेल्या शंभरहून अधिक रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमची फसवणूक केली असून, भूखंड माफियावर कारवाई करण्याची विनंती केली. रामदास ढोले यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री आरोपींविरोधात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला.अटकपूर्व जामिनासाठी... आरोपी राजू तनवाणी हे गुलमंडी वॉर्डाचे नगरसेवक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू आहेत. तर राज आहुजा हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांना न्यायालयात धाव घेण्याची संधी देण्यासाठीच त्यांच्यापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची वार्ता आधीच पोहोचविण्यात आली असावी, अशी चर्चा आज सुरू आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपी पळून कोठे जातील? त्यांना न्यायालयासमोर यावेच लागणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा क रीत आहोत. आरोपींना जामीन मिळू नये, इतके पुरावे न्यायालयासमोर सादर करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.