शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:20 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या होणाºया त्रासाबद्दल आक्रमकपणे व्यथा मांडल्या. काही ठिकाणी वैयक्तिक हितापोटी आणि राजकीय दबावापोटी अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचा जोरदार आरोप नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या होणाºया त्रासाबद्दल आक्रमकपणे व्यथा मांडल्या. काही ठिकाणी वैयक्तिक हितापोटी आणि राजकीय दबावापोटी अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचा जोरदार आरोप नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला. त्यांचा हा आरोप एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांच्या बराच जिव्हारी लागला. कारण फेरोज खान यांनी आपल्या वॉर्डातील अतिक्रमण अलीकडेच काढले आहे.सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत दमडी महल येथील अतिक्रमणावरून एमआयएम नगरसेवकांनी रौद्र रूप धारण केले होते. काही नगरसेवकांनी महापौरांच्या अंगावरही धावून जाण्याचा प्रयत्न केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ताठर भूमिका घेतल्याने एमआयएम नगरसेवकांनी मौनव्रत धारण केले. राजदंडापर्यंत एमआयएम नगरसेवक पोहोचले तर त्यांनी राजदंडाला हात लावण्याची तसदी घेतली नाही. या प्रकरणात प्रभारी आयुक्तांनी खुलासा केला की, दोन दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. हा वादग्रस्त विषय संपत असतानाच राज वानखेडे यांनी सलीम अली सरोवराच्या बाजूला आणि पाठीमागे मातीचा भराव टाकून अतिक्रमण होत असल्याचा मुद्या लावून धरला. या प्रकरणातही तीन ते चार दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रभारी आयुक्तांनी दिले. दिल्लीगेट येथील रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे निर्देश महापौर घोडेले यांनी दिले. अतिक्रमणांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासनही महापौरांनी दिले.विद्युतच्या फायलींसाठी आटापिटाएलईडी दिवे लावण्यासाठी मनपाने ११० कोटींचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीला वर्कआॅर्डरही दिली आहे. दरम्यान, नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांमध्ये एलईडी दिवे लावण्यासाठी लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून ठेवले आहे. या फायलींना ब्रेक लावण्याचे काम डी. एम. मुगळीकर यांनी केले. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हातावर या फायली मंजूर करून घेण्यासाठी सोमवारी सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवक बराच ‘आटापिटा’करताना दिसून आले.२० दिवस झाले तरी १५० कोटींची निविदा प्रक्रियाच सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर संपवून वर्कआॅर्डर द्या, असा आग्रह महापौरांसह नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत धरला. लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याची निविदाही लवकरात लवकर अंतिम करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २३ जानेवारी रोजी किमान ५ बसेस सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले.