शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची मालमत्ता कर वसुली फक्त ११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:03 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या मालमत्ता कर वसुलीचा आलेख प्रचंड खालावला आहे. मागील नऊ महिन्यांत फक्त अकरा ...

औरंगाबाद : महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजला जाणाऱ्या मालमत्ता कर वसुलीचा आलेख प्रचंड खालावला आहे. मागील नऊ महिन्यांत फक्त अकरा टक्के वसुली झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका महापालिकेला चांगलाच बसला आहे. अनलॉकनंतरही परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही, हे विशेष. वसुलीच नसल्यामुळे प्रशासनाने यंदा अर्थसंकल्पात समाविष्ट केलेल्या विकासकामांना अर्धचंद्र मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेची खालावलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी अलीकडेच मालमत्ता वसुलीचा भार उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे सोपविला. मागील आर्थिक वर्षात तब्बल ११० कोटी रुपये एवढी विक्रमी वसुली झाली. त्यानंतर २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी थकबाकीसह मालमत्ताकराचे उद्दिष्ट तब्बल ४६८ कोटी रुपये निश्चित केले. परंतु, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरात कोरोना संसर्गाची साथ सुरू झाली. त्यामुळे जूनपर्यंत कर वसुली जवळपास बंदच होती. त्यानंतर हळूहळू वसुलीला सुरुवात झाली असली तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. १ एप्रिलपासून डिसेंबरअखेरपर्यंत नऊ महिन्यांत केवळ ५३ कोटी रुपये इतकाच मालमत्ता कर वसूल झाला आहे. हे प्रमाण अवघे ११.३७ टक्के इतके आहे. गतवर्षी याच कालावधीपर्यंत ६३ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. आता चालू आर्थिक वर्षाचे तीन महिनेच शिल्लक राहिले आहेत. आता संपूर्ण उद्दिष्ट गाठायचे झाल्यास राहिलेल्या तीन महिन्यांत ४०५ कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. नागरिक आणि व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता यंदा वसुली शंभर कोटीपर्यंत जाईल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

नऊ महिन्यांत मालमत्ता कर वसुली

झोन अधिकारी-उद्दिष्ट-वसुली-टक्केवारी

१ नंदकिशोर भोंबे-४८ कोटी-३ कोटी ८५ लाख-०८ टक्के

२ प्रकाश आठवले-४९ कोटी-३ कोटी ७६ लाख- ७.५ टक्के

३ मुकुंद कुलकर्णी-३१ कोटी-१ कोटी ७७ लाख-५.५ टक्के

४ विक्रम दराडे-३९ कोटी-३ कोटी ५१ लाख ८. ८ टक्के

५ सविता सोनवणे- ५५ कोटी- ७ कोटी ५३ लाख१३. ०५ टक्के

६ मीरा चव्हाण-४२ कोटी-४ कोटी १० लाख-९.६९ टक्के

७ महावीर पाटणी-६४ कोटी-९ कोटी ३ लाख-१४ टक्के

८ संतोष टेंगळे-७३ कोटी- ८ कोटी १ लाख- १०.८६ टक्के

९ एस.आर.जरारे-६२ कोटी- ६ कोटी १९ लाख- ९.९१ टक्के

मुख्यालय-०००-५ कोटी ५१ लाख -००

एकूण-४६८ कोटी-५३ कोटी ३१ लाख-११.३७ टक्के