शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 'पत्नी फोन करतेय, मुलगा रडतोय; मला सोडा हो' : थेट क्वारंटाईनमधून बातचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:44 IST

कोरोनाग्रस्तासोबत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला पुतण्या भावनिक

ठळक मुद्देक्वारंटाईनमधील रुग्णांची मानसिकता बिघडलीय क्वारंटाईनपेक्षा अफवांचा त्रास होतोय...

- सोमनाथ खताळ

बीड : मी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलो, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. परंतु माझ्या चुलत्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. माझा स्वॅब निगेटिव्ह आल्याने मन हलके झाले आहे. परंतु दोन दोन मिनिटाला पत्नी फोन करतेय, छोटा मुलगा रडत आहे. फोन करून नातेवाईकही विचारपूस करत आहेत. मला खुप मानसिक त्रास होतोय. मला सोडा हो, अशी भावना संस्थात्मक अलगिकरण (क्वारंटाईन) कक्षात असलेल्या कोरोनाग्रस्ताच्या पुतण्याने व्यक्त केली. यावेळी त्याला आश्रु अनावर झाले. हे सांगतान तो धायमोकलून रडत होता. 

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील दोघे जमातसाठी अहमदनगरला गेले होते. तेथेच त्यातील ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्ताची दुचाकी सहकाऱ्याकडे होती. ३० मार्चला त्याचा सहकारी पिंपळ्याला आला. पुन्हा २ एप्रिलला ते दुचाकी घेऊन कोरोनाग्रस्ताला द्यायला गेले. या सहकाºयाला आणण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा पुतण्या नगरला गेला. नंतर दोघेही दुपारच्यावेळी पिंपळ्याला आले. रात्रीच्या सुमारास कोरोनाग्रस्त व्यक्ती हा आपल्या दुचाकीवरून पत्नीसोबत पिंपळ्याला आले होते. ते बीडला आल्याचे समजताच दोघांनाही अहमदनगर जिल्हा  रुग्णालयात दाखल केले होते.

दरम्यान, कोरोनाग्रस्तासोबत आपलाच संपर्क आल्याची अफवा गावभर पसरली आहे. माझा संपर्क हा दुसऱ्या व्यक्तीसोबत आला होता. माझा स्वॅब घेतला, तो निगेटिव्ह आला आणि इथून पुढे मला क्वारंटाईन  पण केले आहे. मला कोरोनाचे गांभीर्य आहे. परंतु गावात व तालुक्यात जी अफवा पसरली आहे, याचा मानसिक त्रास खुप होतोय. लोक फोन करून विचारत आहेत. चुकिची माहिती पसरत असल्याने कुटूंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोण पण बदलला आहे, असेही क्वारंटाईनमधील व्यक्तीने सांगितले.

लोकांनो, घराबाहेर पडू नका...मी सुश्क्षििात आहे. माझे गावात आपले सरकार केंद्र आहे. मला प्रशासनाच्या सुचनांची आणि कोरोनाचे पूर्ण गांभीर्य आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून मी समाधानी आहे. परंतु स्वॅब घेतल्यापासून झोप नाही, की जेवण जात नव्हते. खुप त्रास होत होता. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहनही या व्यक्तीने केले. 

क्वारंटाईनपेक्षा अफवांचा त्रास होतोय...मला रुग्णालयात आणले, स्वॅब घेतला हे सुरक्षेसाठी चांगलेच आहे. माझ्यासह सहा लोकांना क्वारंटाईन केले, याचाही जास्त त्रास नाही. परंतू लोकांनी मी कोरोनाग्रस्तासोबत संपर्कात आल्याची जी अफवा पसरविली याचा खुप त्रास होतोय. मीच नगरला जावून कोरोनाग्रस्ताला दुचाकीवर आणले, असेही फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोनाग्रस्त व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या सहा लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आता इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन केले आहे. तसेच अन्य ९ लोकांना आष्टीत क्वारंटाईन केलेले आहे. याचा कालावधी १४ दिवसांचा आहे. - डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड