शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

coronavirus : कोरोनामुळे लांबतेय मातृत्व! प्लॅन प्रेग्नंसीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या झाली नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 14:18 IST

coronavirus : गरोदरपण म्हणजे नियमित दवाखाना. कोरोनाकाळात कशाला दवाखान्यात जाण्याची जोखीम घ्यायची आणि स्वत:सह सगळ्या कुटुंबीयांचाच जीव धोक्यात घालायचा, म्हणूनही मातृत्व पुढे ढकलले जात आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे अनेकांचे आर्थिक उत्पन्न थांबले आहे. अशामध्ये बाळाची जबाबदारी नको म्हणून काही जोडप्यांचा निर्णय लांबणीवर

औरंगाबाद : कोरोनामुळे झालेली मानसिक, शारीरिक, आर्थिक हानी या गोष्टी आपण रोजच पाहतो आणि ऐकतो. एवढेच नव्हे, तर कोरोनामुळे आता अनेकींचे मातृत्वही लांबताना दिसत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या असुरक्षित वातावरणामुळे अनेक महिला त्यांचे मातृत्व पुढे ढकलत आहेत, हा यावर्षीच्या जागतिक मातृदिनाचा एक झाकोळलेला कंगोरा आहे. मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत सगळ्यात पहिल्यांदा मदर्स डे साजरा केला गेला. मदर्स डे कसा सुरू झाला, याविषयी असे सांगितले जाते की, अमेरिकेत ॲना जार्विस यांनी आपल्या आईसाठी कृतज्ञता म्हणून सर्वप्रथम १९०७ मध्ये मातृउत्सव साजरा केला होता. तेव्हापासून या दिवसाची सुरुवात झाली. आता जगभरात मदर्स डेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीचा मदर्स डेदेखील कोरोनाच्या छायेखालीच साजरा होत आहे. मात्र, यावर्षी मदर्स डेनिमित्त समोर आलेले कटू वास्तव म्हणजे अनेक मातांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळे आपले मातृत्व पुढे ढकलावे लागत आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम व्यंध्यत्व निवारणासाठी उपचार घेणाऱ्या महिलांवर झाला आहे. नैसर्गिक पद्धतीने अपत्यप्राप्ती होत नसल्याने उदासीन असलेल्या या महिला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणखीनच हताश झाल्या आहेत.

उपचारासाठी येणाऱ्या महिला नगण्यवंध्यत्वामुळे मातृसुखापासून वंचित असलेल्या महिलांना काही महिने नियमितपणे दवाखान्यात येऊन उपचार घ्यावे लागतात. कोरोनामुळे वंध्यत्व निवारणासाठी दवाखान्यात येणाऱ्या महिलांचे प्रमाण मागील काही महिन्यांपासून नगण्य झाले आहे. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अजूनही बहुतांश महिलांना नाही. त्यामुळे अशा असुरक्षित वातावरणात कशाला दवाखान्यात जायचे, असे सांगून महिलांना कुटुंबियांकडून घरीच थांबविले जात आहे. परिणामी, अशा महिलांचे मातृत्वाचे स्वप्न आणखी लांबते आहे.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी

यामुळे लांबतेय मातृत्व- कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक उत्पन्न थांबले आहे. अशामध्ये बाळाची जबाबदारी नको म्हणून काही जोडपी बाळ होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत.- गरोदरपण म्हणजे नियमित दवाखाना. कोरोनाकाळात कशाला दवाखान्यात जाण्याची जोखीम घ्यायची आणि स्वत:सह सगळ्या कुटुंबीयांचाच जीव धोक्यात घालायचा, म्हणूनही मातृत्व पुढे ढकलले जात आहे.- वंध्यत्व निवारणासाठीचे खाजगी रुग्णालयांमधीले उपचार महागडे असतात. त्यामुळे सध्या हा खर्च उचलणे अनेकांसाठी अशक्य झाल्यानेही अनेक जोडप्यांनी अर्ध्यावरतीच उपचार थांबविले असल्याचे खाजगी आयव्हीएफ सेंटरमधील डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMothers Dayमदर्स डेPregnancyप्रेग्नंसी