शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोना साखळी तोडण्यास पैठणकर एकवटले; 'जनता कर्फ्यूस' मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:48 IST

पैठण शहरात एकाच कुटुंबात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

पैठण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वा प्रशासनाचे कुठलेच आदेश नसताना जनतेने जनतेसाठी पुकारलेल्या ' जनता कर्फ्यूस ' आज पैठण शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शहरातील दारू दुकानेही या जनता कर्फ्यूत बंद राहिल्याने कोरोना साखळी तोडण्यासाठी पैठण शहरात राबविलेला जनता कर्फ्यू हा मॉडेल पँटर्न आता समोर आला आहे. 

पैठण शहरात एकाच कुटुंबात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य केल्याने पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूस शहरात मोठा प्रतिसाद लाभला. दरम्यान शहरात आज पुन्हा एका रूग्णाची वाढ झाल्याने शहरवासीयांची धाकधूक वाढली असून पुकारण्यात आलेल्या तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे नागरिकांनी समर्थन केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर  एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सात सदस्य पॉझिटिव्ह आढळून आल्याने पैठण शहरात खळबळ उडाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन शुक्रवार ते रविवार दि २६ ते २८ जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनास जनतेतून मोठा प्रतिसाद लाभला.जनतेने स्वयंप्रेरणेने जनता कर्फ्यूस प्रतिसाद दिल्याने नगराध्यक्ष सुरज लोळगे,  तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

आज एका रूग्णाची भर....दरम्यान पैठण शहरात आज आणखी एका रूग्णाची भर पडली असून शहरातील एका खाजगी रूग्णालयातील परिचारकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. रूग्णालयातील या परिचारकाच्या संपर्कात आलेल्यांंचे स्वँब घेण्यात आले आहे. सदर रूग्ण हा शहरातील नारळा भागातील रहिवाशी असून शहरातील दारूसलाम व नारळा या दक्षिण व उत्तर टोकाच्या भागात रूग्ण आढळून आले आहेत. नगर परिषदेच्या वतीने हे परिसर निर्जंतुककरून सील करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद