शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:08 IST

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली ३१५६ वर

ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ११६ जणांचा कोरोनामुळे बळी१ हजार ४१५ रुग्ण कोरोनामुक्त

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे़ शनिवारी ११४ बाधित रुग्ण आढळले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ आजपर्यंत बाधितांची संख्या ३ हजार १५६ तर बळींचा आकडा ११६ वर पोहचला आहे़

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सरासरी दीडशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ त्यामुळे रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे़ शनिवारी प्रशासनाला ४५६ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी २९३ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ११४ बाधित आढळून आले़ त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २८, अर्धापूर २, बिलोली १, भोकर ४, कंधार १, नायगांव १, लोहा १, हिंगोली १, यवतमाळ १, नांदेड ग्रामीण २, देगलूर १४, हदगांव ८, किनवट १, मुखेड २२, उमरी १, परभणी ३ आणि लातूर जिल्ह्यातील १ रुग्ण आढळून आला आहे़ तर अँटीजेन किट्सद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २, अर्धापूर ४, बिलोली ३, धर्माबाद १, देगलूर ३, किनवट २, नायगांव ४ आणि माहूर तालुक्यात ३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ सिडको नांदेड येथील ७२ वर्षीय महिला आणि अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा येथील ७२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ सध्या रुग्णालयामध्ये १ हजार ६०८ जणांवर उपचार सुरु आहेत़ त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी १६१, पंजाब भवन ६२६, जिल्हा रुग्णालय ५३, नायगांव ८३, बिलोली ३८, मुखेड १३१, देगलूर ९५, लोहा १३, हदगांव ६४, भोकर ८, उमरी १४, कंधार १७, धर्माबाद २१, किनवट ३१, अर्धापूर २०, मुदखेड १७, हिमायतनगर २०, माहूर १८, आयुर्वेदीक कॉलेज २८, बारड ५, खाजगी रुग्णालय १३७, औरंगाबाद येथे ५, निजामाबाद १, हैद्राबाद १ आणि मुंबई येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले होते़

आतापर्यंत १ हजार ४१५ कोरोनामुक्तशनिवारी जिल्ह्यातील ९२ जणांनी कोरोनावर मात केली़ त्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली़ त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी १३, नायगांव १५, जिल्हा रुग्णालय ४, देगलूर १०, खाजगी रुग्णालय ११, बिलोली ४, गोकुंदा ५, धर्माबाद १० आणि पंजाब भवन येथून २० रुग्णांना घरी पाठविण्यात आले़ आतापर्यंत १ हजार ४१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ दरम्यान, शहरातील पंजाब भवन, विष्णूपुरी येथील रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहे़ त्यामुळे आयुर्वेदीक रुग्णालयात आता बाधित रुग्णांना ठेवण्यात येत आहे़ त्याचबरोबर इतर पर्यायी जागीही प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे़ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड