शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

CoronaVirus : शेतकऱ्यांचे 'रेशमी'स्वप्न भंगले; लॉकडाऊनमुळे हजारो क्विंटल तयार कोष पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 15:50 IST

योग्य वेळी कोष विक्री झाली नाही तर कोषातून फुलपाखरू बाहेर पडून किंमत  होते नगण्य 

ठळक मुद्देबाजारपेठ नसल्याने विक्रीसाठीचे तयार कोष पडून रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत घरातील छतावर कोष वाळविण्याचा प्रयत्न 

पाथरी : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच बाजारपेठ बंद पडल्या आहेत ,याचा फटका सर्वसामान्य सोबतच शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे , तालुक्यातील कासापुरी येथील शेतकऱ्यांने तयार केलेला रेशीम कोष बाजारपेठे अभावी पडून आहे , सहा दिवसात कोष विक्री न झाल्यास त्यातून फुलपाखरू बाहेर पडून कोशाची किंमत नगण्य होत असल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे  शेतकऱ्यांनी तयार झालेला कोष आता नाईलाजाने घराच्या छतावर कोरडा करण्यासाठी वाळू घातला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत मराठवाडा भागात  एकूण रेशीम शेतीच्या 70 टक्के  रेशीम शेती व्यवसाय आहे , रेशीम शेतीत चांगले उत्पादन मिळत असल्याने मागील चार पाच वर्षात परभणी जिल्ह्यात रेशीम शेती व्यवसाय वाढला गेला आहे , या वर्षात रेशीम कोषाला कर्नाटक राज्यातील बाजारपेठ मध्ये 50 हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता.

रेशीम शेती पीक शेतात लागवड केलेल्या तुती च्या पाल्यावर येते , हे पीक खूप अल्पावधीचे असल्याने आणि त्या साठी वेळेनुसार पीक काढणी ते कोष विक्री करावे लागते  , मात्र संचारबंदी सुरू असल्याने   रेल्वे बंद असल्याने कर्नाटकातील बाजार पेठ बंद झाल्या आहेत तर जालना येथील कोष खरेदी बाजारपेठ बंद आहे , त्या मुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला कोष विक्री साठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

छतावर वाळू घालण्याची आली वेळकासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी 200 अंडीजपू घेऊन रेशीमचा क्रॉप घेतला. त्यात 1 क्विंटल 75 किलो कोष निघाला साधारणपणे त्याची बाजार किंमत 80 हजार रुपये ऐवढी आहे. त्यानी  तयार केलेला कोष  विक्री साठी बाजारपेठ बंद आहे , कोष तयार झाल्यानंतर सहा ते आठ दिवसात कोषातून फुलपाखरू बाहेर पडून  कोष खराब होऊन त्याची किंमत नगण्य होत असल्याने बाजारपेठ बंद असल्याने आता तयार कोष घराच्या छतावर वाळू घातला आहे , वाळलेल्या कोषाचे वजन 3 पट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे  तसेच याच गावातील नारायण वैजनाथ बादाडे यांनी ही  150 अंडीजपूचा रेशीम  कोष तयार केला आहे त्याचा या शेतकऱ्याला ही फटका बसला गेला आहे , 

कोष विक्रीसाठी वाहतूक पास मिळेना बीड आणि जालना जिल्ह्यात काही व्यापारी कोष खरेदी करून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या रिलिंग युनिट मध्ये धागा तयार करतात.सध्या च्या अडचणीच्या काळात हे व्यापारी पड्या भावाने कोष खरेदी करत आहेत , तिकडे कोष विक्री साठी न्यायचा म्हटलं तरी वाहनासाठी पासेस मिळत नाहीत असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी