शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, राजेश टोपे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:05 IST

Coronavirus: आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे.

औरंगाबाद : आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग आणि टास्क फोर्स या तिघांनी राज्यातील २५ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले पाहिजे, तर ११ जिल्हे लेव्हल -३ च्या पातळीत ठेवले पाहिजे, असा अहवाल दिला आहे. निर्बंध शिथिल करण्यासंबंधी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. त्याबाबत सोमवारी निर्णय जाहीर होऊ शकतो, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले.ते म्हणाले, निर्बंध शिथिल करण्याबाबतची फाइल आमच्याकडून पाठविण्यात आलेली आहे. आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ या गटाच्या १२ हजार जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्याची जाहिरात ९ ऑगस्टपर्यंत येईल. त्याबरोबर गट-अ म्हणजे स्पेशालिस्ट डाॅक्टर, एमबीबीएस डाॅक्टरांची एक हजार पदे भरण्यास पुढील ४ दिवसांत कार्यवाही केली जाणार आहे. अडचण आली नाही, तर दोन महिन्यांत १०० टक्के जागा भरल्या जातील, असे ते म्हणाले.राज्यातील १०० खाटांच्या रुग्णालयांत सीटीस्कॅन, एमआरआय, डायलिसिस, सोनोग्राफी मशीन दिल्या जाणार आहेत. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार असून, त्यासंदर्भातील निविदा निघाली आहे. ही सेवा गोरगरिबांना मोफत दिली जाईल, असे टोपे यांनी सांगितले. 

अवयवदानासाठी आता नियमांचा विचारअवयवदानासंदर्भात गुरुवारी बैठक होणार आहे. अवयवदानात तामिळनाडू पहिल्या क्रमाकांवर आहे. त्यामुळे आपल्याला नियम बदलावे लागतील का, याचा विचार केला जाईल. जिल्हा रुग्णालयातही अवयदानाची कामे केले जातील. टर्शरी केअरच्या ठिकाणी अवयवदान झाले पाहिजे; पण तेथे काम होत नाही, त्याकडे लक्ष दिले जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे