शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
3
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
5
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
6
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
7
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
8
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
9
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
10
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
11
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
12
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
13
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
14
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
15
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
16
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
17
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
18
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
19
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
20
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता

coronavirus : राज्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट औरंगाबाद शहरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:21 IST

महापालिकेने आधीपासूनच रुग्ण शोधणे, तपासणी करणे आणि उपचार करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर दिला.

ठळक मुद्दे ८९ हजार नागरिकांची तपासणी लवकरच एक लाखाचा टप्पा गाठणार

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : दर एक लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक कोरोना टेस्ट करण्यात औरंगाबाद शहर राज्यात अग्रेसर आहे. एक लाख लोकसंख्येमागे औरंगाबादमध्ये ७४२३ कोरोना टेस्ट झाल्या आहेत.  महापालिकेतर्फे आतापर्यंत ८९ हजार ८२ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून लवकरच कोरोना टेस्टचा एक लाखाचा आकडा गाठणार आहे. 

महापालिकेने आधीपासूनच रुग्ण शोधणे, तपासणी करणे आणि उपचार करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर दिला.  या उपक्रमावर टीकेची झोडसुद्धा उठविण्यात आली.  टीकाकारांची कोणतीही परवा न करता महापालिकेने आपले काम सुरूच ठेवले. 

जुलै महिन्यात कोरोना अँटिजन कीटद्वारे टेस्ट सुरू झाली आणि महापालिकेकडून कोरोना टेस्ट करण्याचा वेग वाढला. यामुळे आता औरंगाबाद हे राज्यात दहा लाख लोकसंख्येच्या मागे ७४२३५ आणि एक लाख लोकसंख्येमागे ७४२३ इतक्या कोरोना टेस्ट करणारे शहर झाले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या बारा लाख आहे. या लोकसंख्येमधील ८९ हजार नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. राज्यातील कोणत्याही शहरात दहा लाख लोकसंख्येमागे एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट झाल्या नाहीत. 

कालपर्यंत मनपाची टीम तपासणीसाठी आली म्हणताच नागरिक घराला कुलूप लावून दुसरीकडे राहण्यास निघून जात असत. आता तपासणीसाठी मनपांच्या शिबिरांमध्ये अक्षरश: रांगा लागत आहेत. हा सकारात्मक बदल मनपाने घडवून आणला आहे. शहरात समूह संसर्गाचा धोका निर्माण झालेला असताना पाण्डेय यांनी ठाकरे यांच्या सूचनेवरून शहरात अत्याधुनिक अँटिजन टेस्टला सुरुवात केली. यामुळे शहरात कोरोना टेस्टने नवीन उच्चांक गाठला. 

१२०० आरोग्य कर्मचाऱ्यांची फौजमहापालिकेच्या वेगवेगळ्या कोविड सेंटरवर सध्या साडेचार हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची १२०० कर्मचाऱ्यांची फौज दिवस-रात्र झटत आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही महापालिकेच्या या कार्याची दखल घेत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांचे टष्ट्वीट करून कौतुक केले आहे.

४००० कर्मचारी कोविडसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महापालिकेतील ९० टक्के  कर्मचारी कोविडच्या कामासाठी नेमण्यात आले आहेत. ३ हजार ५०० कर्मचारी, अधिकारी दिवस-रात्र रुग्णांना आणि रुग्ण शोधण्याच्या कामात मग्न आहेत. जेवण, कंटेन्मेंट झोनमध्ये पत्रे लावणे आदी छोटी-छोटी कामे महापालिकेने कंत्राटदारांना दिली आहेत, त्यानंतरही पालिकेला कर्मचारी अपुरे पडत आहेत.

टेस्ट करण्याचा फायदा अँटिजन टेस्टचा फायदा आता दिसू लागला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर ताबडतोब उपचार सुरू आहेत. पूर्वी शंभरातील २८ नागरिक पॉझिटिव्ह येत होते, आता हेच प्रमाण ११ पर्यंत आले आहे. रुग्णशोध पूर्वी ६ टक्के होता, आता तो १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यूदर पूर्वी ६ टक्के होता, तो आता ३.८ पर्यंत आला आहे.-आस्तिकुमार पाण्डेय, मनपा प्रशासक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद