शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १४ दिवसांतच ५० वर्षांखालील २० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:40 IST

मे आणि जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

ठळक मुद्दे२१ ते ५० वयोगटात मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या १४ दिवसांत २१ ते ५० या वयोगटातील तब्बल २० जणांचा बळी गेला. ५ एप्रिल ते १० जून या कालावधीत या वयोगटात केवळ २४ जणांचा मृत्यू झाला होता; परंतु केवळ १४ दिवसांत हे प्रमाण वाढले.  औरंगाबाद शहरात ५ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. एप्रिलअखेरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ ७ होती; परंतु मे आणि जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १० जूनपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावणाºयांमध्ये ५१ ते ८० या वयोगटातील रुग्णांची  संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळाले, तर २१ ते ५० वयोगटात मृत्यूचे प्रमाण कमी होते. १० जूनपर्यंत म्हणजे अडीच महिन्यांत २१ ते ५० वयोगटातील २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या वयोगटातील रुग्णांना फारसा धोका नसल्याचे सांगितले जात होते; परंतु याच वयोगटात २४ जूनपर्यंत एकूण ४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. त्यामुळे १४ दिवसांत या वयोगटात २० बळी वाढले आहेत.

मृत्यूचा धोका आला विशीपर्यंतएका विशीतील तरुणीचा बुधवारी कोरोनाने बळी गेला. मृतांमधील आतापर्यंतचा हा सर्वात कमी वयाचा रुग्ण ठरला आहे. त्यामुळे मृत्यूचा धोका विशीपर्यंत आल्याची चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबादेत असे वाढले प्रमाण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद