शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कोरोनाची लाट मुळावर; समृद्धी महामार्गाचे काम ‘ऑक्सिजन’वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:08 IST

corona virus hits Samruddhi Mahamarg work जिल्ह्यातून गेलेला ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील एक लेन मेअखेर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) होते.

ठळक मुद्देतीन हजार मजुरांना गावी जाण्यापासून धरले रोखूनबोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुरवठादारांनी सध्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबविला असून, या महामार्गावरील विविध पूल, अंडरपास, ओव्हरपास, इंटरचेंजच्या वेल्डिंगची कामे खोळंबली आहेत. 

जिल्ह्यातून गेलेला ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील एक लेन मेअखेर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) होते. त्यानुसार जिल्ह्यात या महामार्गाची कामे करणाऱ्या ‘मेगा इंजिनिअरिंग’ व ‘लार्सन अँड टुब्रो’ या दोन कंत्राटदार संस्था अहोरात्र काम करीत आहेत; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ही कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. सध्या या दोन्ही कंत्राटदार संस्थांकडे पाच हजार परप्रांतीय मजूर काम करीत होते. यापैकी होळीच्या सणानिमित्त यापैकी दोन हजार मजूर गावी निघून गेले. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढला आणि गावी गेलेले मजूर परत आलेच नाहीत. कामावर असलेल्या मजुरांमध्येही मोठी अस्वस्थता आहे; परंतु त्यांना या दोन्ही कंत्रादार संस्था, ‘एमएसआरडीसी’चे अधिकार दिलासा देत असून, त्यांची निवास, भोजन व आरोग्याची काळजी घेतली जात आहे. अलीकडे दहा दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपूल, इंटरचेंजेस, अंडरपास, ओव्हरपाससाठी वेल्डिंगची कामे ऑक्सिजनअभावी मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. शासनाच्या आदेशानुसार स्थानिक पुरवठादार कंपन्यांनी ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे तूर्तास ही कामे थांबली आहेत.

मजुरांनी गावी जाऊ नये म्हणून प्रयत्न ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, गेल्या वर्षाचा आणि यंदाच्या लॉकडाऊनमुळे महामार्गाची कामे एक महिना मागे गेली आहेत. गेल्या वर्षी जिल्हा आणि राज्याच्या सीमा बंदी असल्यामुळे महामार्गाच्या कामासाठी लागणारे साहित्य बाहेरगावाहून आणणे अत्यंत कठीण झाले होते. यंदा तेवढी अवघड परिस्थिती नाही. ‘एल अँड टी’ ही कंत्राटदार संस्था कामामध्ये पुढे असून, ८७ टक्के, तर ‘मेगा’चे ६८ टक्के काम पूर्ण झाले आहे. होळीसाठी गावी गेलेले मजूर १५ दिवसांत परत येत असतात. पण, महिना झाला तरी ते अजून परत आले नाहीत. सध्या आहे त्या मजुरांची आम्ही काळजी घेत असून, त्यांनी गावी जाऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहोत.

महिनाभरात बोगद्याचे कामबोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २९५ मीटर लांबीच्या बोगद्याच्या दोनपैकी एका लेनचे काम २२२ मीटर एवढे झाले आहे. सोबतच दुसऱ्या लेनचेही काम सुरू असून, ११० मीटर एवढे डोंगर कोरण्याचे काम पूर्ण झाले आहे. ३० मेपर्यंत बोगद्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या