आरोग्य विभाग, नगरपालिका, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने उपयोगात आणलेल्या या नामी शक्कलमुळे शनिवारीही रस्ते सामसूम दिसले. शनिवारी रस्त्यावर नागरिक दिसले की, त्यांची रुग्णवाहिकेत कोंबून कोरोना चाचणी केली जात होती. अशा प्रकारे दिवसभरात ७२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रशासनाने अवलंबिलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळले. यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी, विनोद करमनकर, आशिष औटी, मुख्याधिकारी सैय्यद रफिक, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, उपमुख्याधिकारी ए.एम. पठाण, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, ओम लहाने, अनवर पठाण, पोनि. राजेंद्र बोकडे, सपोनि. नालंदा लांडगे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो : सिल्लोड शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यांची रुग्णवाहिकेत अँटिजन चाचणी करताना कर्मचारी.
100421\img-20210410-wa0310_1.jpg
सिल्लोड शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पकडून त्यांची रुग्णवाहिकेत ॲंटिजेन चाचणी करताना कर्मचारी.