शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बेघर नागरिकांची कोरोना तपासणी सुरू

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाच निवारागृहातील सुमारे दीडशे व्यक्तींची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारपासून निवारागृहातील ...

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाच निवारागृहातील सुमारे दीडशे व्यक्तींची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारपासून निवारागृहातील बेघर व्यक्तींची कोरोना चाचणी सुरु केली आहे. पहिल्या दिवशी २२ बेघर व्यक्तींची चाचणी केली असता एकजण पॉझिटिव्ह निघाला. शुक्रवारी देखील निवारागृहातील बेघर व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार १७ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हे व सर्व महापालिका क्षेत्रांत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी बीओपीव्ही व्हॅक्सिन वापरण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी पालिका आरोग्य विभाग सज्ज आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रेल्वे, विमानाने आलेल्या २१८ प्रवाशांची तपासणी

औरंगाबाद : महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. विशेष करून दिल्ली येथून येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे. ४ डिसेंबर रोजी १९४ आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आले. गुरुवारी केलेल्या चाचणीत एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. चिकलठाणा विमानतळ येथे २४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. केलेल्या तपासणीत एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

७ हजार घरांचे मनपाकडून सर्वेक्षण

औरंगाबाद : कोरोना संसर्गासोबतच डेंग्यूसह इतर साथरोगांच्या प्रतिबंधासाठीही महापालिकेच्या आरोग्य विभागाला विविध उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. शासन आदेशान्वये पालिका काही महिन्यांपासून सातत्याने विशेष अ‍ॅबेटिंग मोहीम राबवत आहे. याअंतर्गत शुक्रवारी शहरातील नऊ प्रभागांत ७ हजार ४८३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात २२७ डेंग्यूच्या डास उत्पत्तीची स्थाने आढळून आली. औषध फवारणी करत मलेरिया विभागाच्या आरोग्य पथकांनी ती नष्ट केली.