औरंगाबाद : जिल्ह्यात दोन दिवसांनंतर सोमवारी पुन्हा कोरोना मृत्युचक्र सुरू झाले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील दोन, तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरात ३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ४८ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ७९५ एवढी झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३२ रुग्णांत मनपा हद्दीतील २८, ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४० आणि ग्रामीण भागातील आठ अशा एकूण ४८ रुग्णांना सोमवारी सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना सिडको कॉलनीतील ६६ वर्षीय, कन्नड तालुक्यातील जामडी येथील ५६ वर्षीय पुरुष आणि जळगाव जिल्ह्यातील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
छत्रपती चौक १, गणेशनगर, सिडको १, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर १, ब्रिजवाडी १, उत्तरानगरी १, विजयनगर १, भारतमातानगर १, ज्योतीनगर १, उल्कानगरी १, बीडबाय पास २,अन्य १७,
ग्रामीण भागातील रुग्ण
खामगाव, फुलंब्री १, अन्य ३ .