विजयकुमार गाडेकर शिरूर का.तालुक्यात सहा परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत सर्वच केंद्रावर कॉपीचा शिमगा होत असून, केंद्राभोवती जत्रेचे स्वरूप दिसून येत होते. सरस्वतीस्वरूप मानल्या जात असलेल्या पुस्तकांची काम झाल्यानंतर सर्रास होळी केली जात असल्याचे चित्र दिसत होते.शिरूर शहरात दोन केंद्र, तिंतरवणी, आर्वी, रायमोहा आणि पांगरी या सहा केंद्रावर जवळपास २०९८ विद्यार्थी परीक्षेस बसले असल्याचे सूत्राकडून सांगितले जाते. शनिवारी इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षेला आठ आणि मदतीला साठ याप्रमोण केंद्राभोवती गर्दी होती. परीक्षेचा अर्थच आता संपुष्टात आला आहे. त्याची फारशी कोणालाच फिकर नाही.परीक्षा केंद्राच्या अवस्था, विद्यार्थी आसन व्यवस्था पाहता याला परीक्षा म्हणायच्या का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. नियम धाब्यावर बसवून सध्या सर्व केंद्रांवर ‘सुरळीत’ परीक्षा सुरू आहेत.
शिरूर तालुक्यामध्ये कॉपी‘युक्त’ परीक्षा
By admin | Updated: March 11, 2017 23:48 IST