जालना : जिल्हा निवड समितीच्यावतीने रविवारी घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक परिक्षेत मोबाईलच्या सहाय्याने कॉपी करताना एका परिक्षार्थीस पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा निवड समितीच्यावतीने रविवारी विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. शहरातील सेंटमेरी हायस्कूलच्या हॉल क्रमांक ४ मध्ये लिपीक , टंकलेखक पदासाठी परीक्षा देत असलेला ज्ञानेश्वर शालिकराम दहातोंडे (रा. कादोली ता. जि. बुलढाणा) हा मोबाईलच्या माध्यमातून बाहेरून अज्ञात व्यक्तीकडून उत्तराची माहिती घेवून ते उत्तरपत्रिका सोडविताना आढळून आला. याप्रकरणी जाफराबाद तहसील कार्यालयातील कर्मचारी विलास पाखरे यांच्या फिर्यादीवरून दहातोंडे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
लिपिक, टंकलेखक परीक्षेत कॉपी
By admin | Updated: September 5, 2016 00:45 IST