शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कूलर, एसी, रेफ्रिजरेटर व्हेंडरचे उत्पादन थंडावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतींमधील कूलर, वातानुकूलित यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर कंपन्यांसाठी पूरक यंत्रसामग्री तयार करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम जाणवत ...

औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतींमधील कूलर, वातानुकूलित यंत्रे (एसी), रेफ्रिजरेटर कंपन्यांसाठी पूरक यंत्रसामग्री तयार करणाऱ्या उद्योगांवर मोठा परिणाम जाणवत आहे. सध्या या उत्पादनाची विक्री बंद आहे. दुसरीकडे उद्योगांसाठी ऑक्सिजन देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे उद्योग व संबंधित व्हेंडर्स अडचणीत सापडले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उद्योगधंदे जास्त प्रभावित झाले आहेत. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर, कूलरची (व्हाइट गुडस्‌) विक्री जोरात असते. मात्र, राज्यात व राज्याबाहेरही कोरोनाची लाट थोपविण्यासाठी लॉकडाऊन लागल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. त्याचा परिणाम, ‘व्हाइट गुडस्‌’ उत्पादक उद्योगांवर झाला आहे. पूर्वी औरंगाबादेत व्हिडिओकॉन कंपनीसाठी पूरक यंत्रसामग्री, आवश्यक उपकरणे तयार करणारे व्हेंडर्स मोठ्या प्रमाणात होते. अलीकडे ही कंपनी बंद पडल्यामुळे जे व्हेंडर्स होते ते शेंद्रा, वाळूज व पुण्याजवळील रांजणगाव येथील ‘व्हाइट गुडस्‌’ उत्पादक कंपन्यांशी जोडले गेले. या कंपन्यांकडून येथील व्हेंडर्सना मोठ्या प्रमाणात ऑर्डर असतात. सध्या शासनाने ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिल्यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. या उद्योगाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे व्हेंडर्सवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या ४० ते ६० टक्के उत्पादन क्षमतेवर हे उद्योग आले आहेत. या उद्योगांतील कामगार कमी झाले आहेत. शिफ्ट कमी झाल्या आहेत. कामाची गती मंदावल्यामुळे आठवड्यातील अवघ्या चार दिवसच हे उद्योग सुरू आहेत.

चौकट.....

उद्योगांना कामगारांची टंचाई

‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. यावेळी उद्योग पूर्णपणे बंद नसून संथगतीने सुरू आहेत. मात्र, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे उद्योगांना कामगारांची टंचाई जाणवत आहे. दुसरीकडे बाजारपेठा बंद असल्यामुळे ‘व्हाइट गुडस्‌’बरोबर ऑटोमोबाइल्स उद्योगांवरही परिणाम जाणवत आहे, असे असले तरी हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.