शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएचओ’पदावरून वादंग!

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

बीड : जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभारावरुन शनिवारी वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच राजकारण रंगले. अखेर प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार

बीड : जिल्हा आरोग्य अधिकारी पदाच्या अतिरिक्त पदभारावरुन शनिवारी वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलेच राजकारण रंगले. अखेर प्रधान सचिवांच्या सूचनेनुसार शनिवारी जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही. वडगावे यांनी डीएचओपदाचा एकतर्फी पदभार घेतला.११ आॅगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा आरोग्य अधिकारी वर्ग १ संवर्गातील जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांना देणे अपेक्षित होते़ मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ़ कमलाकर आंधळे यांना १४ आॅगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला़ डॉ. आंधळे हे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख आहेत. शिवाय क्षयरोग अधिकारीपदाचाही त्यांच्याकडे अतिरिक्त ‘चार्ज’ आहे. याबाबत १५ आॅगस्ट रोजी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले़ या वृत्तानंतर राज्याचे उपसचिव रा़ शं़ जाधव यांनी सीईओ राजीव जवळेकर यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रधान सचिव सुजाता सोहनिक यांनी सीईओ जवळेकर यांना भ्रमणध्वनीवरुन डॉ़ वडगावे यांनाच अतिरिक्त पदभार सोपविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सीईओ राजीव जवळेकर यांनी शनिवारी डॉ. वडगावे यांना डीएचओपदाचा पदभार देण्याबाबतचे आदेश काढले. अधिकारी कोणीही असो;पण नियम डावलायला नको!सभापती संदीप क्षीरसागर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, आरोग्य विभागातून सामान्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. अधिकारी कोणी का येईना;फक्त नियमाने यावा. डॉ. आंधळेंना अतिरिक्त पदभार दिला होता. डॉ. वडगावे वर्ग एकचे अधिकारी आहेत; परंतु त्यांची फाईल रितसर न फिरता थेट आदेश आले. ही पूर्ण प्रक्रिया पाहता यात पारदर्शकता दिसत नाही. त्यामुळे सीईओंच्या आदेशाला विरोध आहे. जर नियमानुसार फाईल आली असती तर आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते़ (प्रतिनिधी)