शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड मोहिमेला हरीतक्रांती सेनेचा हातभार

By admin | Updated: April 9, 2017 23:19 IST

बीडवनविभागाची वृक्षलागवड मोहिम तोंडावर आली असून विभागीय प्रशासन कामाला लागले आहे.

राजेश खराडे  बीडवनविभागाची वृक्षलागवड मोहिम तोंडावर आली असून विभागीय प्रशासन कामाला लागले आहे. यंदा नव्यानेच या मोहिमेला मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र हरीत सेनेच्या माध्यमातून सदस्य नोंदणी केली जात आहे. यामध्ये बीड जिल्हा राज्यात चौथ्या स्थानी असून अद्यापपर्यंत १ लाख ३३ हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे. वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साधण्यासोबतच संगोपन होणे गरजेचे आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातून ६० हजार सदस्यांचा सहभाग या मोहिमेत होणे गरजेचे होते. मात्र, तालुका पातळीवर अधिकारी-कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे उद्दिष्टापेक्षा दुपटीने सदस्यांनी सहभाग नोंदवला. विभागीय वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार वनव्यवस्थापन समिती नेमण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांचा सहभाग राहिला आहे. यंदा वृक्षलागवडीची मोहीम आठवडाभर राहणार असून १ जुलै रोजी सुरूवात होणार आहे. १२ लाख ८२ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असून वनविभागाच्या माध्यमातून सुमारे ८ लाख ८० हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय यांनाही उद्दिष्ट ठरवून दिले आहे. लागवडीपासून संवर्धनापर्यंत ग्रीन आर्मीच्या भूमिकेत हरीत क्रांतीचे सदस्य राहणार आहेत. उद्दिष्टानुसार सदस्य नोंदणी झाली असली तरी जून महिन्यात शाळा, महाविद्यालय सुरू होताच या मोहिमेत गती येणार आहे. सदस्य नोंदणीत उस्मानाबाद जिल्हा अग्रस्थानी असून लातूर, सोलापूर पाठोपाठ बीडचा क्रमांक असून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली जाणार आहे.