शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार वृक्ष लागवड करुन पर्यावरण संवर्धनास हातभार

By admin | Updated: September 16, 2014 01:32 IST

बीड: झाडांची दिवसेंदिवस होत असलेली कत्तल आणि यामुळे पर्यावरणास पोहंचत असलेला धोका याचे भान लक्षात घेऊन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्नीकच्या

बीड: झाडांची दिवसेंदिवस होत असलेली कत्तल आणि यामुळे पर्यावरणास पोहंचत असलेला धोका याचे भान लक्षात घेऊन येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्नीकच्या विद्यार्थ्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात एक हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावला आहे. तसेच यावेळी रक्तदानही करण्यात आले.येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात सोमवारी अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शशिकांत डिकले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभियंता सुंदरराव लटपटे, रवि देशमुख यांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली. यामध्ये विविध प्रकारची झाडे होती. विद्यार्थ्यांनी अभियंता दिनाचे औचित्य साधून साजरे केलेले उपक्रम स्तुत्य असल्याचे लटपटे यांनी सांगितले. जसे झाडे लावली तसेच त्या झाडांचे रक्षण करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यामध्ये ३० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील डॉ. आर.एस. अवचरमल, डॉ. श्रीकृष्ण नागरगोजे, दिलीप अवचरमल, धर्मराज घुले यांची उपस्थिती होती. श्रेया वाघिरकर या एकमेव विद्यार्थिनीने रक्तदान करून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला. प्राचार्य डिकले यांनी श्रेयाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)