बीड : रोहयो अंतर्गत हातावर पोट असलेल्यांना रोजगार मिळावा म्हणून शासनाने गावांगावंमध्ये विविध कामे सुरू करून रोजगार देण्याचा उद्देश ठेवला. याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. मात्र यात ठेकेदारांनी घुसखोरी करून केवळ शासनाचीच नाही तर ग्रामस्थांची देखील फसवणूक करून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलेले आहे. जिल्ह्यात रोहयो अंतर्गत विविध कामे केलेली आहेत. सुरूवातीच्या काळात अधिकारी, कर्मचारी यांनी ग्रामस्थांशी समन्वय ठेवून कामे सुरू केली. परंतु जसे संबंधीत ठेकेदाराने या कामात लक्ष घातले, तसे योजनेला सुरूंग लागत गेला. शासकीय कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव आणून चूकीच्या पध्दतीने कामे केली. यामुळे रोहयोपासून खरे मजूर दूर गेले. परिणामी ठेकेदारांनी गावच्या मतदार यादीप्रमाणेच मजूरांची यादी बनवून मजूर दाखवले व पैसे लाटले. दरम्यान, ५० लाखांहून अधिक रूपयांचा खर्च झालेली १६ गावे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या रडारवर आहेत. कुठल्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळेबाजांची पाचावर धारण आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदारांनी मजुरांसह प्रशासनाला धरले वेठीस
By admin | Updated: November 30, 2015 23:32 IST