नळदुर्ग : कंटेनरचालकाने वाहनाच्या केबिनमध्येच विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जयशंकर ढाब्यासमोर उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याहून हैैदराबादकडे कार घेऊन जाणारा कंटेनर (क्र. एमएच १५/ सीके ९१०४) हा बुधवारी सकाळी जळकोट येथील जय शंकर ढाब्यासमोर थांबला होता. यावेळी चालक तानाजी महादेव लाटे (वय ५५, रा. ढेकरी, ता.तुळजापूर) याने कंटेनरच्या केबिनमध्ये विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याचे तेथील उपस्थितांना दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती कळाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी दत्ता व्यंकट लाटे (रा. ढेकरी) यांनी दिलेल्या माहितीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ सिकंदर तांबोळी करीत आहेत.
कंटेनर चालकाची केबिनमध्ये आत्महत्या
By admin | Updated: August 18, 2016 00:53 IST