शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

औरंगाबादेत घर खरेदीसाठी परजिल्ह्यातील ग्राहकही अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- ...

विकासकामांना गती : पुणे, मुंबईऐवजी शहरात घर खरेदीकडे कल

औरंगाबाद : नवीन जलवाहिनीद्वारे पूर्णक्षमतेने जायकवाडीचे पाणी शहरात येणार. मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपन्यांचे होत असलेले करार, समृद्धी महामार्ग, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्ग, देशातील विविध मोठ्या शहरात सुरू होत असलेली विमानसेवा, उच्चदर्जाच्या वैद्यकीय सेवा, शिक्षण यामुळे पर्यटनाच्या या राजधानीत स्वतःचे घर असावे, अशी परजिल्ह्यातील लोकांची मानसिकता तयार झाली आहे. याची प्रचिती मागील चार महिन्यांत दिसून आली.

जालना ते लातूरपर्यंतच्या शहरात हक्काचे घर ग्राहक खरेदी करीत आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकानी सांगितले की, लॉकडाऊननंतर मराठवाड्यातील लोकांचा पुणे, मुंबई, नाशिककडे घर खरेदीचा ओढा कमी झाला आहे. मागील चार महिन्यांपासून औरंगाबादमध्ये स्वतःचे फ्लॅट, रोहाऊस, बंगला खरेदीसाठी परजिल्ह्यांतील लोक येत आहेत. यात जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, लातूर येथील ग्राहकांचा जास्त समावेश आहे. मराठवाड्याच्या राजधानीमध्ये घर खरेदीचा वाढता कल असण्याची कारणेही तशीच आहेत.

मूलभूत सोयीसुविधा हे यातील महत्त्वाचे कारण ठरत आहेत. औरंगाबादकरांनी १० वर्षांत पाणीटंचाईचा खूप त्रास सहन केला. कारण जायकवाडी ते औरंगाबाद जलवाहिनी जुनी झाली. यामुळे गळती वाढली. वस्ती वाढल्याने सहा दिवसांनी नळाला पाणी येते. पण, आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी नवीन १६८० कोटी रुपयांच्या जलवाहिनी योजनेचे भूमिपूजन केले. किमान २० टक्के काम पूर्ण होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मोठी जलवाहिनी टाकून शहरात मुबलक पाणी आणण्याचे काम सर्वप्रथम होणार आहे. या कामासाठी तीन वर्षांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत असल्याने लोकांचा विश्वास वाढला आहे. सातारा- देवळाइलाही या योजनेचा फायदा होणार आहे.

खड्डेमुक्त रस्त्याकडे वाटचाल

आज शहरतील निम्मे रस्ते खड्डयात आहे, तर निम्मे रस्ते सिमेंट काँक्रीटचे व डांबरी करण्यात आले आहे.

यासाठी १५० कोटी रुपये प्राप्त झाले असून, या वर्षात २३ रस्ते पूर्ण केले जातील. यामुळे शहराची वाटचाल खड्डेमुक्त रस्त्याकडे सुरू आहे. विशेष म्हणजे शहराची भौगोलिक रचना अशी आहे की, २० ते ३० मिनिटांच्या आत आपण शहरातील कोणत्याही कोपऱ्यात पोहोचू शकतो. पुणे, मुंबई सारखी वाहतूक जामची येथे परिस्थिती नाही.

महामार्गाचे जाळे

नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग औरंगाबादमधून जात आहे. या महामार्गाचे काम वेगाने होत आहे. येत्या काळात हा महामार्ग तयार होऊन जलदगतीने औरंगाबादकरांना मुंबई, नागपूरला जाता येईल. औरंगाबाद, वैजापूर टप्प्याची कामे ६० टक्के पूर्ण झाली आहे. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच सध्या पळशी व सावंगी येथे डोंगर पोखरून बोगदा तयार केला जात आहे. तसेच शहराच्या दक्षिण बाजूने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामही त्याच गतीने पुढे सुरू आहे. जळगाव सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू आहे. या महामार्गाचा जसा नागरिकांना फायदा होईल, तसेच येथील व्यापार- उद्योगालाही मोठा फायदा होणार आहे. त्यांना मिळालेल्या ऑर्डर वेळेत पूर्ण करून जलदगतीने देशभरात पोहोचविता येणार आहे. तसेच चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळा येथून मुंबई, दिल्ली सह देशांतील मोठ्या महत्त्वाच्या शहरात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. औद्योगिक पर्यटनालाही मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

चौकट

डीएमआयसी विकासाचे नवपर्व

दिल्ली- मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीमध्ये २०२१ या नवीन वर्षात मोठी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या निमित्ताने १२८ कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे. त्यांना वाळूज, पैठण एमआयडीसीत उद्योगांना जागा दिली आहे. ऑरिक सिटीतील ३० कंपन्या येण्याबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेंद्रा-डीएमआयसी आणि बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची शासकीय गुंतवणूक झालेली आहे.

फूडपार्कसाठी जागा देण्यात आली आहे. येत्या काळात येथेही कंपन्या गुंतवणूक करतील. यामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. भविष्यात बहुराष्ट्रीय कंपन्या येथे येणार असल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यामुळे शहरात घर खरेदीसाठी मराठवाड्यातील लोकांचा कल वाढत आहे. त्यादृष्टीने बांधकाम व्यावसायिक नवनवीन गृहप्रकल्पाची आखणी करीत आहेत.

--

चौकट -

शहरातील जमेच्या बाजू

१) मूलभूत सोईसुविधा उपलब्ध.

२) दळणवळणासाठी विविध पर्याय.

३) उच्च शिक्षणाची व्यवस्था.

४) अद्ययावत वैद्यकीय सुविधा.

५) शेद्रा-बिडकीन, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, औद्योगिक वसाहतीमुळे नोकरीच्या मोठ्या संधी.

६) अत्याधुनिक गृहप्रकल्पाची उभारणी.

७) शांत शहर असल्याने उद्योग- व्यवसाय वाढीला पोषक वातावरण.

८) पर्यटनाची राजधानी असल्याने पर्यटनसाठी पोषक वातावरण.

९) खवय्यांसाठी देश व विदेशांतील सर्व पदार्थांची खाद्यसंस्कृती.

१०) मनोरंजनासाठी सिनेमागृह, थिएटर व खरेदीसाठी विस्तारणीय बाजारपेठ व मॉलची उपलब्धता.