शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेसह ग्राहक अटकेत

By admin | Updated: March 22, 2017 16:24 IST

मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगरातील एका घरात खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर गुन्हे शाखेच्या

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 22 - मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगरातील एका घरात खुलेआम सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा मारला. या छाप्यात एका महिले सह एक ग्राहकास पोलिसांनी अटक केली आणि तीन तरुणींची मुक्तता केली. मुकुंदवाडी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संगीता खरे उर्फ शेजवळ (३७,रा.स्वराजनगर)आणि ग्राहक सर्जेराव जाधव (रा. मुकुंदवाडी)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सांगितले की, मुकुंदवाडी रेल्वेपटरी परिसरातील स्वराजनगर येथील एका घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दोन सरकारी पंचाना सोबत घेऊन दोन बनावट ग्राहक आंटीच्या घरी पाठविले. यावेळी तिने तीन तरुणी त्यांच्यासमोर उभ्या केल्या आणि प्रत्येकी एक हजार रुपये त्यांचा रेट असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी एवढे पैसे नसल्याचे सांगून हजार रुपयांमध्ये त्यांना तरुणी उपभोगायला देण्याची तयारी दर्शविली. शिवाय तिच्याच घरातील रिकामी खोली उपलब्ध केली. यावेळी संगीता ही घरातच कुंटणखाना चालवित असल्याचे सिद्ध होताच बनावट ग्राहकांनी पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा मारला.या छाप्यात तीन तरुणींची मुक्तता करण्यात आली. शिवाय या महिलेसह ग्राहकाविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हा नोंदविला. बुधवारी सकाळी त्या महिलेला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, कर्मचारी नबाब पठाण आणि अन्य कर्मचाऱ्यांनी केली. तिच्या घरात रोख बारा हजार रुपये आणि कंडोमचे पाकिटे पोलिसांना आढळले आहेत. बँक खात्यात चार लाख रुपयेपतीपासून विभक्त राहणाऱ्या संगीताचे दोन बँकेत खाते असून, या खात्यात सुमारे ४ लाख रुपये आहेत. तिने याच एरियात दुसऱ्या घराचे बांधकाम सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली. वेश्या व्यवसाय करण्यासाठी तिने बोलविलेल्या तरुणींना ती प्रती ग्राहकासाठी ४००रुपये देत आणि स्वत: ६००रुपपये घेत, होती असे पोलिसांनी सांगितले.