लातूर : लातूर जिल्ह्यात सर्व शिक्षा अभियानातंर्गत अनेक शाळांतील धोकादायक वर्गखोल्या आणि नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यात आली़ त्यासाठी ५० वर्गखोल्यांना बांधकाम परवानगी देण्यात आली होती़ यातील २९ वर्ग खोल्यांचे काम अर्धवट आहे. तर २१ ठिकाणच्या वर्गखोल्यांचे काम पाण्याअभावी सुरूच झाले नाही.लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत धोकादायक शालेय इमारती, वर्ग खोल्या पाडण्याची परवानगी तसेच त्या वर्गखोल्या नव्याने बांधण्याची परवानगी घेण्यात आली होती़ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळांतील ५० वर्ग खोल्या बांधण्याची परवानगी देण्यात आली होती़ या योजनेमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार होती़ जिल्ह्यातील २९ शाळांनी वर्गखोल्यांची कामे सुरू केली आहेत़ त्यातील दोन शाळेच्या वर्ग खोल्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत़ तर जिल्ह्यातील २१ शाळांनी पाणीटंचाईचे कारण दाखवून वर्ग खोल्यांचे काम अद्यापही सुरूच केले नाहीत़ लातूर जिल्ह्यातच सर्वत्र पाणीटंचाई असल्याचे चित्र दिसत असतानाही विद्यार्थ्यांच्या शिक्षण सुविधेसाठी पाणी उपलब्ध करून वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले़ काही शाळा कामे पूर्णत्त्वासाठी प्रयत्नशील आहेत़ (प्रतिनिधी)यामध्ये औसा तालुक्यातील हसेगावाडी ३ वर्ग खोल्या, सेलू १, काळमाथा १, उटी (बु.)४, चिंचोली काजळे ४, कुलकर्णी तांडा २, निलंगा तालुक्यातील बोटकुळ २, अहमदपूर तालुक्यातील हासरणी १, उमरगा यल्लादेवी १, उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा २, अशा एकूण २१ वर्ग खोल्यांची कामे सुरूच करण्यात आले नाहीत़
पाणीटंचाईमुळे शाळांचे बांधकाम खोळंबले
By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST