शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नव्या बसगाड्यांची बांधणी झाली ठप्प

By admin | Updated: October 17, 2016 01:14 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत ९८ आयशर बसेसची बांधणी केल्यानंतर आता नव्या बसगाड्यांची बांधणी ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत ९८ आयशर बसेसची बांधणी केल्यानंतर आता नव्या बसगाड्यांची बांधणी ठप्प झाली आहे. चेसीसच्या पुरवठ्याअभावी मार्चपर्यंत केवळ जुन्या बसेसच्या पुनर्बांधणीचे काम याठिकाणी चालणार आहे. महामंडळ खाजगीतून बसेस बांधून घेत आहे. त्यामुळे कार्यशाळा बंद पाडण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप एस. टी. कर्मचारी संघटनांकडून होत आहे.एस. टी. महामंडळाच्या दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत बसेसची बांधणी केली जाते. अशोक लेलँड आणि टाटा कंपनीच्या बसगाड्यांसह आयशर कंपनीच्या बसची बांधणी याठिकाणी करण्यात आली. एकट्या चिकलठाणा कार्यशाळेत काही दिवसांपूर्वी ९८ आयशर बसेसची बांधणी झाली. ‘एसटी’च्या बांधणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा याठिकाणी आहे. परंतु तरीही महामंडळ खाजगीतून बसेस बांधणी करून घेण्यावर भर देत आहे. अशा प्रकारे सुमारे ५०० बसेस घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता कार्यशाळांना चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आल्याचे दिसते आहे. त्यामुळे कार्यशाळेत नव्या बसगाड्यांची बांधणी थांबली आहे. मार्चपर्यंत कार्यशाळेत केवळ बसेसची पुनर्बांधणीचे काम चालणार असल्याची माहिती ‘एसटी’च्या सूत्रांनी दिली. ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या बसेसचा मोठा वाटा आहे. कार्यशाळेची क्षमता असताना बाहेरून बसेसची बांधणी करून घेतली जात आहे. चेसीसचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. परंतु कार्यशाळेस कुशल मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली पाहिजे. कार्यशाळेत नव्या बसेसची बांधणी सुरू राहण्यासाठी प्रसंगी आंदोलनही केले जाईल, असे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे साहेबराव निकम म्हणाले.