शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परतूर जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग कार्यालय उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:13 IST

कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : कुठलीही पूर्व सूचना न देता नगरपालिकेने जेसीबीच्या साह्याने संरक्षक भिंतच पाडून टाकल्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय उघड्यावर आले आहे. जि.प. च्या उप अभियंत्यांनी मुख्याधिकाºयांना नुकसानभरपाईचे पत्र दिल्याने आता हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.परतूर येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे कार्यालय रेल्वे स्टेशन जवळ वाटूर कडे जाणाºया मुख्य रोडवर आहे. या कार्यालयास अर्धवट बांधकाम केलेली संरक्षक भिंत होती. ही भिंत अचानक एके दिवशी नगर पालिकेने जेसीबीच्या जमीनदोस्त केली.तसेच एक लिंबाचे झाडही तोडण्याचा प्रयत्न केला. ही भिंत पाडल्याने आता हे कार्यालय उघड्यावर आले आहे. नगर पालिका व बांधकाम विभाग हे दोन्ही शासनाचे कार्यालय आहेत. कुठलाही पत्र व्यवहार न करता पालिकेने सरळ भिंतच पाडण्याचा कार्यक्रम पहाटे ६ ते ८ वाजे दरम्यान केला आहे. यावेळी एक नगरसेवकही उपस्थित होते. ही कारवाई कोणाच्या दबावाने की, आदेशाने करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आता हा वाद रंगण्याची चिन्ह दिसून लागली आहेत.जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता रजनीकांत दिवेकर यांनी नगर पोलिकेच्या मुख्याधिकाºयानां पत्र पाठवून सदरील भिंत विना परवानगी व कुठलीही कायदेशीर क ार्यवाही न करता पाडली आहे.यामुळे २ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. ही पाडलेली भिंत तत्काळ बांधून द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. यावर मुख्याधिकाºयांनी काहीच उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच आता ही भिंत पाडण्याची कारवाई का करण्यात आली याची शहरात चर्चा सुरू असण्या बरोबरच उपअभियंत्यांनी भिंत बांधून देण्याचे पत्र दिल्याने हे प्रकरण कोणावर शेकते याकडेही नागरिकांचे लक्ष आहे.