शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

गाळे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

सुमेध वाघमारे , तेर जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे.

सुमेध वाघमारे , तेरजिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून २०१२ मध्ये ग्रामपंचायतीने गाळे बांधकाम सुरु केले. मात्र या गाळे बांधकामाला पशुसंवर्धन विभगाने विरोध दर्शवत, सदरील जागेवर दावा केला आहे. त्यामुळे हे काम मागील दोन वर्षापासून रखडले आहे. परिणामी ग्रामपंचायतीला गाळ्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजावरील भुर्दंड सोसावा लागत आहे.तेर येथे बाजारपेठेचा विकास व्हावा, या प्रमुख उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास निधीतून (डीव्हीडीएफ) कर्जाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने १५ लाख रुपये कर्ज मंजुरही केले. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी ग्रामपंचायतीकडे कर्जाची रक्कम वर्ग करण्यात आली. त्यानंतर २ जुलै रोजी मंजूर रक्कमेपैकी ५ लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले.दरम्यान, रक्कम उपलब्ध होताच २५ जुलै २०१२ रोजी ५ गाळ्यांच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. या बांधकामासाठीचे कॉलम उभा करण्यात आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या जागेवर आपला हक्क दाखविला. तोवर सदरील कामावर १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले होते. एकीकडे ग्रामपंचायत तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभाग या जागेवर दावा करत असल्यामुळे हे बांधकाम अखेर बंद पडले. दोन वर्षे झाली तरी या जागेचा तिडा सुटलेला नाही. त्यामुळे अद्यापही गाळ्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पहावयास मिळते. (वार्ताहर)व्याजापोटी भरले २५ लाखग्रामपंचायतीला मंजूर झालेल्या एकूण कर्जापैकी १ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र व्याज ५ लाख रुपयांचे भरावे लागत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेने व्याजापोटीचे २५ हजार रुपये भरा, असे पत्र ग्रामपंचायतीला पाठविले होते. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी २५ हजार रुपये भरले आहेत. एकंदरीतच गाळ्याचे बांधकाम रखडले असले तरी व्याजाचा भुर्दंड मात्र ग्रामपंचायतीला सोसावा लागत आहे. यातून तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.