शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात दिवसाला दीड लाख लिटर पाणी बांधकामास

By admin | Updated: March 30, 2016 00:51 IST

माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये,

माजलगाव : येथील तहसीलदारांनी तीन महिन्यांपूर्वी एका पत्राद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांना सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने बांधकाम परवाना देण्यात येऊ नये, असे आदेश असतानाही मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मागील तारखेत परवाने घेऊन बांधकामे सुरू आहेत. दिवसाला दीड लाख लिटरपेक्षा जास्त पाणी बांधकामावर वाया जात आहे.दुष्काळाची झळा पाहता येथील तहसीलदार डॉ. अरूण जराड यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी सी गावित यांना एक पत्र पाठवून शहरात नवीन बांधकामास परवानगी देऊ नये, असे आदेश दिले असतानाही मागील तारखेत परवाने येथील कर्मचारी देत आहेत. तर शहरात सध्या शेकडो अनधिकृत बांधकामे सुरू असुन शहरात मोठया प्रमाणावर नियमबाह्य व्यापारी संकुल उभारण्याचे काम सुरू असताना व या बाबत अनेकांनी तक्र ारी केल्या आहेत. असे असताना देखील याची कसलीच दखल पालिकेने घेतलेली नाही. सध्या शहरात नियमबाह्य व विनापरवाना शेकडो बांधकाम व व्यापारी संकुलाची कामे सुरु आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहे. (वार्ताहर)