शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

वास्तवाचे दर्शन अभिनयातून घडवा

By admin | Updated: May 4, 2016 01:25 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील युवा कलावंतांमध्ये प्रचंड ऊर्जा व जबरदस्त इच्छाशक्ती आहे. तरीही न्यूनगंडामुळे ते मागे पडतात. पुणे- मुंबईसारख्या महानगरात जाऊन वास्तव जीवनाचे

औरंगाबाद : मराठवाड्यातील युवा कलावंतांमध्ये प्रचंड ऊर्जा व जबरदस्त इच्छाशक्ती आहे. तरीही न्यूनगंडामुळे ते मागे पडतात. पुणे- मुंबईसारख्या महानगरात जाऊन वास्तव जीवनाचे दर्शन अभिनयातून घडविणारे कलावंत यशस्वी ठरले आहेत, असे प्रतिपादन ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’फेम अभिनेता योगेश सिरसाठ यांनी रविवारी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाच्या ४१ व्या नाट्य महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विभागप्रमुख डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. स्मिता साबळे यांची उपस्थिती होती. यावेळी नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी योगेश सिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपल्या कारकीर्दीची जडणघडण याच विभागात झाली. मेहनत व जिद्दीच्या बळावर आपण मुंबईत जाऊन नाव कमवू शकतो. पुणे- मुंबई व आपल्या जीवनशैलीत खूप फरक आहे. त्यामुळे आपण आपली मूळ शैली जपून अभिनय केला पाहिजे. स्वत:मधील न्यूनगंड झटकून देऊन करिअर घडवा, असेही ते म्हणाले.नाट्यशास्त्र विभागाची देदीप्यमान परंपरा मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचे मत बाबा भांड यांनी व्यक्त केले. मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे तशीच ती कलावंतांची भूमी असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे म्हणाले. डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी प्रास्ताविकात विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सुनील टाक याने संचालन केले. प्रा. गजानन दांडगे यांनी आभार मानले.