पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, जनतेत गेल्याशिवाय जनतेची समस्या कळत नाही. शेतकऱ्यांना विचारा काय करतो, काय खातो, कसा राहतो ,कसा जगतो, कसा माल पिकवतो, काय भाव विकतो, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करा. ऐनवेळी जनतेशी संपर्क साधण्यापेक्षा नेहमी जनतेशी संपर्क साधून त्यांच्या समस्येचे निराकरण केले तर जनता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभी राहील. असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपाध्यक्ष विशाल शेळके, अजय पाटील चिकटगावकर, तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, राजेंद्र मगर, बाळासाहेब भोसले, प्रेम राजपूत, रवि मोहरकर, भाऊसाहेब मुंदवाडकर,रिखबचंद पाटणी, उत्तमराव निकम, प्रशांत शिंदे, पी.आर.जाधव, दत्तू जाधव, शेषराव जाधव, दत्तू पाटील वाकलेकर आदींची उपस्थिती होती.
गाव, वाड्या, वस्त्यांवरील जनतेशी नाळ जोडा- जयसिंगराव गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:04 IST