शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीची ?

By admin | Updated: August 11, 2014 00:32 IST

औरंगाबाद : वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

औरंगाबाद : वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील घडामोडी पाहता ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाल्यास वैजापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हेच प्रबळ दावेदार ठरू शकतात. वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसलाच सुटत आला आहे; परंतु गेल्या दोन पंचवार्षिकचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर काँग्रेसचे भाऊसाहेब ठोंबरे व डॉ. दिनेश परदेशी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकार राहिले, त्यांना यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पाठबळ देऊन उमेदवारी देण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या बदल्यात काँग्रेसच्या वाट्याला अन्य मतदारसंघ जाऊ शकतात. विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे निश्चित आहे. तसे पाहिल्यास वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकला असता; परंतु चिकटगावकर बंधूंच्या वादामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे द्यावा लागला. दोघांमधील भांडणामुळे दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येतो. मागील निवडणुकीत चिकटगावकर बंधू अपक्ष उमेदवार म्हणून आमनेसामने होते. परंतु आता चिकटगावकर बंधूंमध्ये दिलजमाई झाल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे. मागील निवडणुकीत कैलास पाटील चिकटगावकर यांना १४ हजार, तर भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांना ५० हजार मते मिळाली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. सेनेचे आ. आर.एम. वाणी यांचा केवळ १२०० मतांनी विजय झाला होता. डॉ. दिनेश परदेशी यांना ४० हजार मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष म्हणून रामहरी जाधव नशीब अजमावण्याच्या तयारीत आहेत.