शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या जागांवर कॉँग्रेसच्या आज मुलाखती

By admin | Updated: August 31, 2014 00:43 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद संतप्त काँग्रेसने आता राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांना मुंबईत पाचारण केले असून, रविवारी दिवसभरात ११४ जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादराष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्वच २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यामुळे संतप्त काँग्रेसने आता राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांना मुंबईत पाचारण केले असून, रविवारी दिवसभरात ११४ जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. काँग्रेस आघाडीतील विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ मतदारसंघांतून इच्छुकांची चाचपणी करून काँग्रेसने दि.१० आॅगस्ट रोजीच या याद्या तयार ठेवल्या होत्या; परंतु आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सुटलेल्या १७४ जागांसाठीच काँग्रेसने मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील इच्छुकांची चाचपणी करून दि.२० आॅगस्ट रोजी संपूर्ण मतदारसंघनिहाय याद्या तयार केल्या व सर्वच मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती तीन दिवसांपूर्वीच घेतल्या. राष्ट्रवादीच्या वाट्याच्या मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती आयोजित करून काँग्रेसने राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीकडील पैठण व गंगापूर-खुलताबाद मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नव्हत्या. या दोन्ही मतदारसंघांतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींनी मुंबईला बोलावले आहे. त्यानुसार सर्व इच्छुक मुंबईला रवाना झाले आहेत. शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, पक्षाने कालच यासंदर्भातील पत्र पाठवून औरंगाबाद मध्यमधून लढू इच्छिणाऱ्यांना मुंबईला बोलावले आहे. मध्यमधून १२ इच्छुक उमेदवार असून, आम्ही मुंबईला निघालो आहोत. उद्या सकाळी ११.३० वाजता मुलाखती होणार आहेत. राज्यातील ११४ जागांसाठी या मुलाखती होणार आहेत. त्यानंतर सोमवारी (दि.१ सप्टेंबर) आझाद मैदानावर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. काँग्रेसकडून जिल्ह्यात शंभरांहून अधिक इच्छुक काँग्रेसकडून लढण्याची इच्छा तब्बल शंभरांहून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी दाखल करून यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यात एससी प्रवर्गासाठी राखीव पश्चिममधून ३४ इच्छुक आहेत. मध्यमधून १२ व पूर्वमधून ४ इच्छुकांसह उर्वरित सहा मतदारसंघांतून शंभरांहून अधिक कार्यकर्ते स्पर्धेत उतरले आहेत. जागा वाटपाचा तिढा आघाडीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सध्याच्या परिस्थितीत आघाडी व युती होणार आहेच, असे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगतात; परंतु ऐनवेळेस काही बिनसले तर गडबड नको म्हणून हे सर्व सुरू असल्याचे त्यांचे मत आहे.