शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी

By admin | Updated: May 13, 2016 00:10 IST

औरंगाबाद : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात गुरुवारी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाली.

औरंगाबाद : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यासंदर्भात गुरुवारी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ झाली. यामुळे पक्षाचे कार्यालय असलेल्या शहागंजमधील गांधी भवनात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, अशी हाणामारी झाल्याचा शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी इन्कार केला आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष पवार यांच्या कथित वादग्रस्त विधानावरून युवक काँग्रेसचे लियाकत खान पठाण आणि सोशल मीडिया विभागाचे राज्य कार्यकारिणी सदस्य जमील अहमद खान यांच्यात हा वाद झाला. यावेळी या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. विखे पाटील हे १५ मे रोजी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेव पवार तसेच राज्याचे पदाधिकारी असलेले अरुण मुगदिया, अशोक सायन्ना यादव तसेच युवक काँग्रेससह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हे पदाधिकारी बैठकीनंतर आतील रुममध्ये गेले असता बाहेर हा प्रकार घडला. काय म्हणाले पवार?सर्व विभागाच्या जुन्या कार्यकारिणी बरखास्त झाल्या आहेत, अशा प्रकारचे विधान आपण कोणत्याही माध्यमांशी बोलताना केले नाही, असा दावा नामदेव पवार यांनी केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना पवार म्हणाले की, काही वादविवाद असतात. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा कोणताही प्रकार झाला नाही. विखेंचा दौराविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यात वैजापूर येथून पाहणी सुरू करणार आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा अहवाल ते प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविणार आहेत. दुुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचीही ते भेट घेणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार आणि इतर पदाधिकारी राहणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनासंबंधी गुरुवारी गांधी भवनात बैठक झाली. हाणामारीचे कारणनवनियुक्त शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी शहरातील पक्षाचे सर्व सेल (विभाग) बरखास्त केल्याचे विधान माध्यमांशी बोलताना केले.वर्तमानपत्रातील यासंबंधीच्या बातमीची पोस्ट जमील खान यांनी सोशल मीडिया विभागाचे सदस्य या नात्याने फेसबुकवर टाकली. ही पोस्ट फेसबुकवर का टाकली, अशी विचारणा करून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते लियाकत पठाण यांनी खान यांना थप्पड लगावली. त्यानंतर इतर कार्यकर्तेही धावले. दोन्ही बाजूंनी काही वेळ धक्काबुक्की आणि वादविवाद झाला. काही जणांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडविले.