शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या सभेची काँग्रेसकडून जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:07 IST

अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़खा़ राहुल गांधी यांचा परभणी दौरा निश्चित झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मागील १५ दिवसांपासून या दौºयाची तयारी सुरू करण्यात आली होती. जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी ३ वाजता खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही संघर्ष सभा होणार आहे़ यासाठी ५०० बाय २०५ फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे़ १७ हजार ५०० खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून, १५ हजार नागरिक बसतील, अशी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे ३० बाय ४८ फुटाचा मुख्य मंच उभारण्यात आला असून, या मंचावर प्रमुख पाहुण्यांसाठी ४५ खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे़ प्रत्येकाला खा़ राहुल गांधी यांचे भाषण ऐकता यावे, यासाठी या भव्य मंडपात सहा मोठे एलईडी उभारण्यात आले आहेत़ मंडपात प्रवेशासाठी देखील नियोजनबद्ध सुविधा करण्यात आल्या आहेत़तीन व्हीआयपी गेट करण्यात आले असून, इतरांसाठी दोन गेटची व्यवस्था केली आहे़ महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असेल़ प्रत्येक नागरिकांची बायोमॅट्रिक तपासणी करूनच सभामंडपात प्रवेश दिला जाणार आहे़ गुरुवारी सकाळपासूनच कार्यकर्ते सभास्थळी नियोजनामध्ये गुंतले होते़काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, मनपातील सभागृह नेते भगवान वाघमारे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बंडू पाचलिंग आदींनी सायंकाळच्या सुमारास सभामंडपाची पाहणी केली़ सावली विश्रामगृह ते जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयापर्यंतच्या संपूर्ण परिसरात पोलीस प्रशासनाने तपासणी केली आहे़ तसेच सभास्थळी सकाळपासून विविध भागात तपासणीचे काम करण्यात आले़ सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय करण्यात आले आहेत़ शुक्रवारी सावली विश्रामगृह ते जिंतूर रोड या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, या दृष्टीनेही स्थानिक पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे़ ठिक ठिकाणी वाहतूक कर्मचाºयांचे पॉर्इंट निश्चित करण्यात आले आहेत़