शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर

By admin | Updated: September 11, 2014 00:01 IST

हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदासाठी पात्र उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडेच असून दोन्हीकडून या पदासाठी हालचाली सुरू आहेत.

हिंगोली : पंचायत समिती सभापतीपदासाठी पात्र उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडेच असून दोन्हीकडून या पदासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी व बसपा सदस्य सहलीवर गेल्याने पुन्हा जुनेच समीकरण जुळण्याची शक्यता बळावली आहे.हिंगोली पंचायत समितीत मागील वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने बसपाच्या सदस्याला सोबत घेऊन बाजी मारली होती. त्यात छगन बनसोडे हे सभापतीपदी विराजमान झाले. तर बसपाच्या विनोद नायक यांना उपसभापतीपद मिळाले होते. सभागृतील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर कॉंग्रेस-५, राष्ट्रवादी कॉंग्रेस-३, शिवसेना-४, भाजपा-३ व बसपा १ असे संख्याबळ आहे. मागीलवेळी बसपाशी नाते जोडले तरी युतीच्या उमेदवारांना स्पष्ट बहुमत मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय अवलंबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे बसपाने सुरक्षित डाव खेळत उपसभापतीपदाची बक्षिसी मिळवत कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. यावेळी राष्ट्रवादीकडेच सभापतीपदाचे उमेदवार आहेत. यात लताबाई जाधव व सीताबाई राठोड यांचा समावेश आहे. त्यामुळे सभापतीपद राकॉंकडेच जाणार, हे तेवढे निश्चित मानले जाते. उपसभापतीपदी कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. त्यात दुल्लेखॉं यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर बसपाचे नायक यांना मागीलवेळी पद मिळाल्यामुळे ते यावेळी केवळ बाहेरून पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जाते. अधिकृतरीत्या हे कोणीही बोलायला तयार नाही. मात्र हे सदस्य सहलीवर गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)