शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने सर्व समाजाला न्याय दिला

By admin | Updated: September 1, 2014 00:26 IST

सेलू : सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही कृषी संवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली़

सेलू : काँग्रेस पक्षाने सर्व जाती- धर्मातील घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे़ सेलू शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही कृषी संवर्धन व मत्स्य व्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली़ सेलू येथे नगरपालिकेच्या श्री साई नाट्यमंदिरात रविवारी आयोजित अल्पसंख्यांक मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ़ रामप्रसाद बोर्डीकर होते़ नगराध्यक्ष सुरेश कोरडे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, सभापती दत्तराव मोगल, तालुकाध्यक्ष नामदेव डख, विलास रोडगे, वहीद अन्सारी, रफिक अली खान, रहीम खान पठाण, रघुनाथ बागल, महेबुब कुरेशी आदींची उपस्थिती होती़ शासनस्तरावर अल्पसंख्यांकासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे़ तसेच मुस्लीम समाजातील मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वसतिगृहांची उभारणी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.शहरातील बैल बाजार व कत्तलखान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून निधीची तरतूद लवकरच करू, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले़ शहरात मुस्लिम समाजासाठी अद्ययावत शादीखाना उभारण्यासाठी सिल्लोड शहरातील मॉडेलचा वापर करावा, असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले़ आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सर्व समाज घटकाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सुरेश कोरडे, नगरसेवक रहीम खान पठाण, नामदेव डख यांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन जखीयोद्दीन खतीब यांनी केले़ अबरार बेग यांनी आभार मानले़ मेळाव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ मेळाव्यास नागरिकांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजनतालुक्यातील अल्पसंख्यांक मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शहरातील सारंग गल्ली परिसरात १०० मुलींचे वसतिगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पशूसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले़ यावेळी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, नगराध्यक्ष सुरेश कोरडे, हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, नमादेव डख, वहीद अन्सारी, रघुनाथ बागल, रवींद्र डासाळकर, रहीम खाँ पठाण, रफीक अली खाँ, अ़ रशिद अ़ रज्जाक बागवान, सभापती दत्तराव मोगल, धारवारकर यांची उपस्थिती होती़ ३ कोटी १० लाख रुपये खर्चून मुलींच्या वसतिगृहाचे तीन मजली बांधकाम करण्यात येणार आहे़