शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस- भाजपा एकत्रित येणार ?

By admin | Updated: March 4, 2017 00:30 IST

उमरगा : पंचायत समिती निवडणुकीत १८ पैकी ९ जागा काँग्रेसने पटकाविल्या असून, बहुमतासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे़

उमरगा : पंचायत समिती निवडणुकीत १८ पैकी ९ जागा काँग्रेसने पटकाविल्या असून, बहुमतासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे़ भाजपाने ३, सेनेने दोन तर राष्ट्रवादीने चार जागांवर विजय मिळविला असून, काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपाला सोबत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ काँग्रेसकडे सभापतीपद तर भाजपाला उपसभापतीपद देण्याबाबत खलबते सुरू असल्याचेही बोलले जात असून, उपसभापतीपदासाठी भाजपाकडून युवराज जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे़उमरगा पंचायत समितीवर मागील १५ वर्षापासून काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे़ यंदा झालेल्या चौरंगी लढतीत काँग्रेसने १८ पैकी नऊ जागांवर विजय मिळविला आहे़ जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र आजवर असल्याने काँग्रेसने भाजपा, सेनेसोबत राजकीय करार करून ठिकठिकाणी सत्ता मिळविली आहे़ तालुक्यात मात्र, सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हाडवैर आहे़ ही बाब पाहता बहुमतासाठी काँग्रेस भाजपासोबत जाण्याची चिन्हे आहेत़ मागील उमरगा बाजार समिती व नगर पालिका निवडणुकीत काँग्रेसची भाजपासोबत झालेली आघाडी पंचायत समितीतही कायम राहण्याची शक्यता आहे़ दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सत्तेतील राजकीय गणितात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरूनही मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत़ तत्पूर्वी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती निवडले जाणार आहेत़ असे असले तरी जिल्हा परिषदेबाबत होणाऱ्या राजकीय हलचालींवर तालुक्यातील सत्तास्थापनेचे चित्र राहणार आहे़ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश सत्तेतील उपसभापतीपद मिळविण्यास यशस्वी ठरणार का ? याकडे लक्ष लागले आहे़ सभापतीपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने काँग्रेसकडून विद्यमान उपसभापती मदन पाटील, आ़ बसवराज पाटील यांचे चुलत बंधू अ‍ॅड़ राजासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत़ मदन पाटील यांनी उपसभापती असताना केलेली कामे पाहता त्यांना पक्ष प्राधान्य देण्याची चर्चा आहे़ असे असले तरी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेले अ‍ॅड़ राजासाहेब पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे़ आमदार बसवराज पाटील कोणाला सभापतीपदाची संधी देणार ? याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे़ (वार्ताहर)