लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा नियोजन समितीच्या ५ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. तर जिल्हा परिषद गटातून १९ सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. बुधवारी मतमोजणी होऊन जाहीर झालेल्या निकालात नगर परिषद गटातून काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचा एक सदस्य, तर नगर पंचायत गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने विजय मिळवला आहे. असे असले तरी जिल्हा नियोजन समितीवर भाजपाची सदस्य संख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.जिल्हा परिषद गटातून १९ आणि नगर परिषद ४ व नगर पंचायत गटातून एका सदस्याची निवड होते.जिल्हा गटातून सर्व सदस्य बिनविरोध निवडले गेले. तर नगर परिषद आणि नगर पंचायत गटासाठी एकमत न झाल्याने पाच जागांसाठी ३४ उमदेवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे २२ आॅगस्ट रोजी या पाच जागांसाठी मतदान घेण्यात आले. याची मतमोजणी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून काँग्रेसच्या संगीता गोरंट्याल या विजयी झाल्या आहेत.त्यांना ८४ मते मिळाली. सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून राष्ट्रवादी काँगे्रसचे आमेर पाशा हे विजयी झाले असून, त्यांना ७६ मते मिळाली.काँगे्रसचे भोकरदनचे संतोष अन्नदाते हे ७८ मते, तर परतूरच्या काँग्रेसच्या प्रतिभा बंड या ७३ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. नगर पंचायत गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा लहाने या ४२ मते घेऊन विजयी झाल्या.
काँग्रेस ३, तर राष्ट्रवादीचे २ सदस्य विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:01 IST