शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:23 IST

शहर तसेच जिल्हाभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. भीमघाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सोहळा पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहर तसेच जिल्हाभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात अशोक विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. भीमघाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन सोहळा पार पडला.नागपूर येथे १४ आॅक्टोबर १९५६ मध्ये विजयादशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली. तेव्हापासून हा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्ह्यातील बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहण, बुद्धवंदना, पूजापाठ तसेच विविध उपक्रम राबविले जातात.शहरातील भीमघाट येथे शनिवारी सकाळी जी.एम. वाघमारे यांच्या हस्ते भिक्खू संघाच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नाशिकचे केंद्रीय शिक्षक अ‍ॅड. शहाजी वानखेडे, पी. आर. धुळे यांच्यासह धम्म उपासकांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंबेडकर अनुयायांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष वि. वा. एंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रभाकर नांदेडकर यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांना २२ प्रतिज्ञा देण्यात आल्या. यावेळी रविकिरण जोंधळे, युवराज वाघमारे, राजपाल चिखलीकर, संबोधी सोनकांबळे, अ‍ॅड. मंगेश वाघमारे, रेखाताई पंडित, लताताई शिंदे, पार्वती जोंधळे, माधवराव सरपे आदींची उपस्थिती होती.जिल्हाभरात बौद्ध विहारांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील नागसेननगर येथे १ आॅक्टोबर रोजी रक्तदान शिबीर तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर होईल.